मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू रिंकू सिंग याने सलग पाच सिक्स मारत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. गुजरात टायटन्स संघाच्या तोंडचा विजय रिंकूने आपल्या दमदार बॅटींगच्या जोरावर हिसकावला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये भावड्याने 5 सिक्सर मारत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र विचार करा ज्या गोलंदाजाला त्याने हे सिक्स मारले होते त्याची मानसिक स्थिती कशी झाली असेल. करिअरला सुरूवात होण्याआधीच हा मोठा घात होता. ज्या गोलंदाजाला हे सिक्स मारले होते तो गुजरातचा यश दयाल होता.
या सामन्यानंतर यश आजारी पडला होता. इतकंच नाहीतर त्याचं वजनही 8 ते 9 किलोने कमी झाल्याचं हार्दिक पंड्याने सांगितलं होतं. 9 एप्रिलला यश द्यालने अखेरचा सामना खेळला होता. रिंकूच्या सलग पाच सिक्सरची अवघ्या क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली होती. रिंकू सिंग सर्वांना इतका माहित नव्हता मात्र या पाच सिक्सरने तो रातोरात स्टार झाला. दुसरीकडे यश दयाल हा पूर्णपणे खचून गेला होता.
पठ्ठ्याने काही हार मानली नाही कारण तोसुद्धा देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये मुरलेला खेळाडू आहे. गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यामध्ये यशने जोरदार कमबॅक केलं. यशने दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला आऊट केलं. महत्त्वाच्या सामन्यात अभिषेक अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
After the Rinku Singh’s five unforgettable sixes with the bat, Yash Dayal is back for Gujarat Titans.
And he gets a wicket in his first over.
Well done, Yash Dayal. pic.twitter.com/d3DyiGJhpt
— Rahul Sharma (@CricFnatic) May 15, 2023
यशने आपल्या शानदार गोलंदाजीने प्रभाव पाडला. पहिल्या दोन षटकात 18 धावांत 1 बळी घेतला. यशचे अप्रतिम पुनरागमन पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. कोणत्याही खेळाडूसाठी कमबॅक करणं इतकंही सोप नसतं. मात्र गुजरातच्या या युवा गोलंदाजाने करून दाखवलं. या सामन्यानमध्ये विजय मिळवत गुजरात संघाने प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं.