IPL 2023 : ‘यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालमुळे मला…’; युजवेंद्र चहल याचं मोठं वक्तव्य!

IPL 2023 : भारतीय संघाचा खेळाडू युजवेंद्र चहल याने एका मुलाखतीमध्ये बोलतावना जयस्वालबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

IPL 2023 : 'यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालमुळे मला...'; युजवेंद्र चहल याचं मोठं वक्तव्य!
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 4:58 PM

मुंबई : यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत थेट टीम इंडियाची दारे ठोठावलीत. यामध्ये  सर्वात आघाडीवर नाव आहे ते म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू यशस्वी जयस्वाल. राजस्थानकडून सलामीला येत यशस्वीने अनेकदा चांगली सुरूवात करुन दिली. सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीतही गड्याने पहिला नंंबर मारला. अशातच भारतीय संघाचा खेळाडू युजवेंद्र चहल याने एका मुलाखतीमध्ये बोलतावना जयस्वालबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

काय म्हणाला चहल?

यशस्वी जयस्वालमध्ये खूप आत्मवश्वास असून तो मेहनती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो नवीन काही जितकं शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करतो. नेटमध्ये सराव करताना तोस तासनतास फलंदाजी करायचा. त्यामुळे मला कधी फलंदाजी आली नसल्याचं युजवेंद्र चहल याने सांगितलं.

आयपीएल 2023 मध्ये, यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. 48.07 सरासरी आणि 163.61 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने 625 धावा त्याने केल्या. यामध्ये त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. सर्वाधिक यशस्वी असणारा संघ मुंबई इंडिअन्सविरूद्ध त्याने दमदार शतक करत विक्रम रचला होता.

यंदाच्या मोसमामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 खेळाडूंच्या यादीतही जयस्वालचाही समावेश आहे. 14 सामन्यात त्याने 625 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून सलामीला जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल दोघे यायचे. मात्र अर्ध पर्व झाल्यावर बटलर फ्लॉप जाताना दिसला. मात्र यशस्वीने एक बाजू लावून धरत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे.

दरम्यान, राजस्थान संघाने यंदाच्या पर्वामध्ये दमदार सुरूवात केली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पॉइंट टेबलमधील रनरेटही प्लसमध्ये होता. मात्र शेवटाला मोक्याच्या क्षणी काही सामना गमावल्याने त्यांना पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.