Heath Streak Health | झिंबाब्वे टीमचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक याची प्रकृती चिंताजनक, मृत्यूशी झुंज सुरु
आयपीएल 16 व्या मोसम हा आता अखेरच्या टप्प्यात आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 9 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. या दरम्यान क्रिकेट विश्वातून वाईट बातमी समोर आली आहे.
हरारे | आयपीएल 16 व्या मोसमात आता अटीतटीच्या लढतीचा प्रवास सुरु झाला आहे. जो जिंकला तो कायम तर पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपणार आहे. या हंगामातील 59 सामन्यांनंतरही अजून एकही टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान शनिवारी 13 मे रोजी संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता एकूण 4 जागांसाठी उर्वरित 9 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. या टप्प्यावर टीमची एक चूक ही महागडी ठरु शकते. त्यामुळे प्रत्येक टीम आपला आगामी सामना जिंकून प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्याचा प्रयत्नात असणार आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यांना पैसावसूल आणि हायव्होल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत. मात्र या दरम्यान क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.
दिग्ग्ज माजी कर्णधार हा गंभीर आजाराशी लढतोय. या दिग्गजाची प्रकृती अतिशय चिंताजनक आणि गंभीर आहे. त्यामुळे आता चमत्कारच आशा आहे. झिंबाब्वे टीमचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू हीथ स्ट्रीक जीवन-मृत्यूशी झुंज देतोय. मैदानात आपल्या बॅटिंग-बॉलिंगने प्रतिस्पर्धी संघांना चितपट करणारा हा खेळाडू आता मात्र जगण्यासाठी लढतोय. हीथ याला कॅन्सरचं निदान झालंय. चिंताजनक बाब अशी की हीथ याला असेलला कॅन्स चौथ्या टप्प्यात आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, हीथ याच्यावर दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरु आहेत. हीथची प्रकृती अतिशय नाजूक आहे. हीथ या गंभीर आजारातून बरा व्हावा, यासाठी क्रिकेट चाहते हे प्रार्थना करत आहेत. तसेच झिंबाब्वेच्या क्रीडा मंत्र्यांनी ट्विट केलं आहे. “हीथ स्ट्रीक आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात आहे. हीथला भेटण्यासाठी त्याचं कुटुंब दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आता चमत्कारच हीथला वाचवू शकतो. हीथच्या आरोग्यासाठी प्रार्थना सुरु आहेत”, असं ट्विट झिंबाब्वेच्या क्रीडा मंत्र्यांनी केलं आहे.
स्ट्रीकची क्रिकेट कारकीर्द
स्ट्रीकने झिम्बाब्वेचं 65 टेस्ट आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. हीथ स्ट्रीक याने 216 टेस्ट आणि 239 वनडे विकेट्स घेतल्या आहे. तसेच त्याने 1 हजार 990 कसोटी आणि 2 हजार 942 धावाही केल्या आहेत. स्ट्रीकने 2005 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्ट्रीकने 2018 मध्ये आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्ससाठी बोलिंग कोचचीही जबाबदारी पार पाडली होती.
प्रशिक्षकपदाचा 2019 मध्ये राजीनामा
स्ट्रीकने 2018 च्या सुरुवातीपर्यंत राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली. मात्र 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झिंब्बावेचा पात्रता फेरीत पराभव झाला. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारत स्ट्रीकने आपल्या पदाचा राजीनामा दिला.