रोहित शर्माच्या त्या टीकेनंतर आयपीएल ब्रॉडकास्टरनेही सुनावली खरीखोटी! आता काय झालं ते वाचा
रोहित शर्माचा ऑडिओ ऑनएअर केल्याचं प्रकरण आता आणखी तापलं आहे. त्या संदर्भात स्टार स्पोर्ट्सने उत्तर देत सांगितलं की, चॅनेलने त्याचा ऑडिओ रेकॉर्ड केला नाही आणि चालवलाही नाही. त्यामुळे आता खरं कोण आणि खोटं कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहित शर्माकडून चूक झाली का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि स्टार स्पोर्ट्स यांच्यातील वाद आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. रोहित शर्माने ट्वीट करून दोन दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. रोहित शर्माने आरोप केला होता की, खासगी चर्चा टीआरपीसाठी ऑनएअर केली जात आहे. मनाई करूनही ऑनएअर केल्याने रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली होती. पण आता स्टार स्पोर्ट्सने भारतीय कर्णधार रोहित शर्माला जसाच तसं उत्तर दिलं आहे. स्टार स्पोर्ट्सने उत्तर देत रोहित शर्माने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. स्टार स्पोर्ट्सने सांगितलं की, त्यांनी रोहित शर्माचा कोणताही ऑडिओ ऑनएअर चालवलेला नाही. स्टार स्पोर्ट्सने रोहित शर्माला उत्तर देताना सांगितलं की, “रोहित शर्माच्या चर्चेची क्लिप 16 मे वानखेडे स्टेडियममधील आहे. स्टार स्पोर्ट्सकडे ही क्लिप प्रसारित करण्याचे हक्क होते. त्या व्हिडीओत रोहित शर्मा आपल्या मित्रांसोबत चर्चा करत होता. आम्ही तेव्हा कोणताही ऑडिओ आणि कोणतीही चर्चा रेकॉर्ड केली नाही. तसेच प्रसारितही केली नाही. त्या व्हिडीओचा वापर फक्त प्री-शोसाठी झाला होता. पण त्यात कोणताही ऑडिओ नव्हता.”
रोहित शर्माचा व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप केकेआरने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला होता. त्या व्हिडीओवरून वाद झाल्यानंतर केकेआरने तो व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट केला. रोहित शर्माला या ऑडिओमुळे सर्वाधिक त्रास झाला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून सरळ ब्रॉडकास्टरवर आरोप केला होता. पण स्टार स्पोर्ट्स चॅनेलने आता स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, ते खेळाडूंच्या खासगी गोष्टींचा सन्मान करतात.
The lives of cricketers have become so intrusive that cameras are now recording every step and conversation we are having in privacy with our friends and colleagues, at training or on match days.
Despite asking Star Sports to not record my conversation, it was and was also then…
— Rohit Sharma (@ImRo45) May 19, 2024
रोहित शर्माने ब्रॉडकास्टरविरुद्ध ट्वीट करत आरोप केला होता की, आता क्रिकेट खेळाडूंच्या खासगी आयुष्यात घुसखोरी होत आहे. कॅमेरा आता त्यांची प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करत आहे. मग तो मॅचचा दिवस असो की ट्रेनिंगचा दिवस..रोहित शर्माने पुढे ट्वीट करत सांगितलं होतं की, मी त्यांना ही चर्चा रेकॉर्ड करण्यास मनाई केली होती. पण त्यानंतरही त्यांनी चॅनेलवर ही ऑनएअर चालवली. हे खासगी आयुष्याचं उल्लंघन आहे.