IPL 2024 Auction : चेन्नई सुपर किंग्सला मिळाला रवींद्र जडेजाचा पर्याय! प्लेइंग इलेव्हनमध्ये असा होऊ शकतो बदल

आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अष्टपैलू खेळाडूंसाठी बोली लागली. पॅट कमिन्स या टप्प्यात भाव खाऊन गेला. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूकडे होती. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने फिल्डिंग लावली होती. त्याला संघात घेत फ्रेंचायसीने मोठा डाव खेळला आहे. रवींद्र जडेजा पर्याय असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

IPL 2024 Auction : चेन्नई सुपर किंग्सला मिळाला रवींद्र जडेजाचा पर्याय! प्लेइंग इलेव्हनमध्ये असा होऊ शकतो बदल
IPL 2024 Auction : चेन्नई सुपर किंग्सची मोठी खेळी! अष्टपैलू खेळाडूला संघात घेत शोधला दुसरा जडेजा
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 3:28 PM

मुंबई : आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे सर्वात यशस्वी फ्रेंचायसी असल्याचं अधोरेखित झालं आहे. मागच्या पर्वात रवींद्र जडेजाच्या चमकदार कामगिरीमुळे अंतिम फेरीत विजय मिळवला होता. गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. जडेजा मैदानात असेल तर काहीही होऊ शकतं अशी क्रीडारसिकांची भावना असते. आयपीएल २०२४ मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्सने भविष्याचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. रचिन रविंद्रने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. चेन्नई सुपर किंग्सने रचिनला फक्त 1.8 कोटी रुपयात आपल्या संघात घेतलं आहे.

रचिन रवींद्रने आपली बेस प्राईस 50 लाख रुपये ठेवली होती. त्यामुळे त्याला मोठी रक्कम मिळेल असं वाटत होतं. त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण चेन्नई सुपर किंग्सने 1.8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. रचिन रवींद्रची ही पहिली आयपीएल स्पर्धा असणार आहे. रचिन रवींद्र फलंदाजी आणि गोलंदाजीतही वरचढ आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला बसवून त्याला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने शार्दुल ठाकुरला पुन्हा एकदा आपल्या संघात घेतलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला रिलीज केलं होतं. तेव्हा त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. पण चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यासाठी चार कोटी मोजले आणि संघात घेतलं. त्यामुळे शार्दुल ठाकुर हा दुसरा अष्टपैलू खेळाडू चेन्नईच्या ताफ्यात असणार आहे.

अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश थिकशन, मतिश पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन, रवींद्र जडेजा, रवींद्र गडेजा, रु. शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्सने कायम ठेवले आहे.

मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.