IPL 2024 Auction : मिचेल स्टार्कसाठी काय पण, पॅट कॅमिन्सला सोडलं मागे! आयपीएल इतिहासातील सर्वच्या सर्व रेकॉर्ड ब्रेक
आयपीएल 2024 लिलावात मिचेल स्टार्कवर पैशांचा अक्षरश: पाऊस पडला. त्याला संघात घेण्यासाठी फ्रेंचायसींनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आयपीएल इतिहास कधी नव्हे तितकी रक्कम मिचेल स्टार्कसाठी मोजली गेली. त्यामुळे पॅट कमिन्सचा सर्वाधिक बोलीचा विक्रम मोडीत निघाला आहे.
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी दुबईत मिनी ऑक्शन सुरु आहे. या मिनी लिलावात खेळाडूंसाठी कोट्यवधींची रक्कम मोजली गेली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं नशिब या बोलीत फळफळलं असंच म्हणावं लागेल. ट्रेव्हिस हेड, पॅट कमिन्सनंतर मिचेल स्टार्कसाठी सर्वाधिक बोली लागली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक भाव खाऊन गेला. मिचेल स्टार्कला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. मिचेल स्टार्कची बेस प्राईस दोन कोटी रुपये होती. त्याला त्याच्या बेस प्राईसच्या 12 पट अधिक रक्कम मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सने सर्वस्व पणाला लावत त्याच्यासाठी 24 कोटी 75 लाख रुपयांची किंमत मोजली आहे. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. त्यामुळे इतकी रक्कम या खेळाडूसाठी मोजल्याने क्रीडाप्रेमीही आवाक झाले आहेत. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्ससाठी 22.50 कोटी रुपये मोजले होते. त्याची चर्चा सर्वत्र होत असताना मिचेल स्टार्क चर्चेत आला.
कोलकाता नाईट रायडर्सने शार्दुल ठाकुर आणि इतर खेळाडूंना रिलीज केल्यानंतर ताफ्यात तगडा वेगवान गोलंदाज आवश्यक होता. मिचेल स्टार्कची आतापर्यंतची खेळी पाहून डेथ ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी करू शकतो. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने संधी सोडली नाही. दिल्ली जितकी रक्कम बोलायची त्याच्या वर रक्कम मोजण्याची कोलकात्याची तयारी होती. ही रक्कम 24.75 कोटीपर्यंत गेली आणि कोलकात्याने बाजी मारली. मिचेल स्टार्क गेल्या आठ वर्षांपासून आयपीएल खेळलेला नाही. त्यात मागच्या काही सामन्यांमध्ये त्याची खेळी तितकी चांगली नाही. त्यामुळे आजी माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता त्याची कामगिरी स्पर्धेत कशी राहते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.
The record created not long back is 𝘽𝙍𝙊𝙆𝙀𝙉! 🤯
Most expensive player of all time 👇
P̶a̶t̶ ̶C̶u̶m̶m̶i̶n̶s̶ Mitchell Starc 😎
Mitchell Starc is SOLD to #KKR for INR 24.75 Crore 💜#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
चेतन साकरियाला यालाही संघात घेण्यात कोलकात्याला यश मिळालं आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सची वेगवान बाजू भक्कम झाली आहे. आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर या खेळाडूंना कोलकाता नाइट रायडर्सने कायम ठेवलं आहे.