IPL Auction 2024 Live Streaming | पहिल्यांदाच भारताबाहेर ऑक्शन, कुठे कधी केव्हा पाहता येणार?

IPL 2024 Auction Date Time : आयपीएल लिलावाची प्रतिक्षा संपत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते आतुरतने या ऑक्शनची वाट पाहत होते. हा ऑक्शन कुठे कधी पार पडणार, याबाबत सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर

IPL Auction 2024 Live Streaming | पहिल्यांदाच भारताबाहेर ऑक्शन, कुठे कधी केव्हा पाहता येणार?
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 12:50 PM

दुबई | आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आणखी 3 महिन्यांचा कालावधी आहे. सूत्रांनुसार या 17 व्या मोसमाची सुरुवात मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. त्याआधी क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे या 17 व्या मोसमासाठीच्या ऑक्शनकडे लागून राहिलं आहे. या ऑक्शनआधी आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने एकूण 10 संघांच्या सहमतीनंतर रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. तसेच ऑक्शनमध्ये एकूण किती खेळाडू सहभागी होणार, त्यांची नावं जाहीर करण्यात आली.त्यामुळे आता या ऑक्शनमध्ये कुणाचं नशिब फळफळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा लिलाव कुठे पार पडणार हे सर्वकाही जाणून घेऊयात.

आयपीएल 2024 साठी ऑक्शन केव्हा?

आयपीएल 2024 साठी ऑक्शन 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

आयपीएल 2024 ऑक्शनला किती वाजता सुरुवात होणार?

आयपीएल 2024 ऑक्शनला 19 नोव्हेंबर रोजी भारतात दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तसेच स्थानिक वेळेनुसार दुबईत ऑक्शन सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.

आयपीएल 2024 ऑक्शनचं आयोजन कुठे?

आयपीएल ऑक्शनचं पहिल्यांदाच भारताबाहेर आयोजन करण्यात आलं आहे. ऑक्शन दुबईतील कोको कोला अरेना येथे आयोजन करण्यात आलं आहे.

आयपीएल 2024 ऑक्शन टीव्हीवर कुठे पाहता येणार?

आयपीएल 2024 ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

आयपीएल 2024 ऑक्शन मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

आयपीएल 2024 ऑक्शन मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल. चाहत्यांना एकूण 7 भाषांमध्ये लिलाव समजून पाहता येईल.

आयपीएल ऑक्शनचं काउंटडाऊन सुरु

दरम्यान आयपीएल 17 व्या मोसमसाठी तब्बल 1 हजार 166 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं. या 1 हजार 166 खेळाडूंमधून 333 जणांची नावं निश्चित करण्यात आली. आता या 17 व्या मोसमासाठी फक्त 77 खेळाडूंचीच गरज आहे. त्यामुळे या 333 खेळाडूंमधून फक्त 77 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. तर इतर खेळाडू हे अनसोल्ड राहतील. त्यामुळे आता या लिलावात कोणता खेळाडू महागडा ठरतो, आणि कोणते खेळाडू अनसोल्ड राहतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.