MI vs DC Confirmed Playing XI, IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं घरच्या मैदानातून कमबॅक, ‘या’ दोघांनाही संधी

Mumbai Indians vs Delhi Capitals Confirmed Playing XI in Marathi : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना ज्या क्षणाची वाट होती, तो क्षण आला आहे. पलटणमध्ये अखेर सूर्यकुमार यादव याची एन्ट्री झाली आहे. पाहा प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे?

MI vs DC Confirmed Playing XI, IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं घरच्या मैदानातून कमबॅक, 'या' दोघांनाही संधी
mi suryakumar yadav ipl 2024,
Follow us
| Updated on: Apr 07, 2024 | 4:19 PM

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 20 वा सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी बोलावलं. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने दिल्ली विरुद्धच्या या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत.

सूर्यकुमार अखेर परतला

मुंबई इंडियन्समध्ये अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सूर्यकुमार यादव याची एन्ट्री झाली आहे. सूर्यकुमारला दुखापतीमुळे मुंबईच्या पहिल्या 3 सामन्यांना मुकावं लागलं होतं. मात्र सूर्याने आता कमबॅक केलं आहे. सूर्यकुमार यादव परतल्याने नमन धीर याला प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेर केलं आहे. नमनला सूर्याच्या अनुपस्थितीत पहिल्या 3 सामन्यात संधी देण्यात आली. मात्र नमनला मोी खेळी करता आली नाही.

मोहम्मद नबी याचं डेब्यू

अफगाणिस्तानचा ऑलराउंडर अनुभवी मोहम्मद नबी याने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केलं आहे. नबीला मुंबई इंडियन्सने मिनी ऑक्शनद्वारे आपल्या गोटात घेतलं होतं. नबीला पहिल्या 3 सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र आता अखेर नबीला प्लेईंग ईलेव्हनमध्ये डेवाल्ड ब्रेव्हिस याच्या जागी स्थान देण्यात आलंय. तर रोमरिया शेफर्ड याला क्वेना मफाका याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

दिल्लीत 2 बदल

दिल्ली कॅपिट्ल्सने 2 बदल केले आहेत. दिल्ली कॅपिट्ल्सने रसिख डार सलाम याच्या जागी ललित यादव याला संधी मिळालीय. मिचेल मार्शला दुखापत झाल्याने त्याच्या जागी झाय रिचर्डसनला संधी मिळालीय.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.