आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे पलटणचं होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. नाणेफेकेीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. हार्दिकने फिल्डिंगचा निर्णय घेत आम्ही चेसिंग करुन सामना जिंकणार असल्याचं अप्रत्यक्ष स्पष्ट केलं आहे. हार्दिकने कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे.
कोलकाताने आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोलकाता आपल्या त्याच 11 खेळाडूंसह मुंबई विरुद्ध भिडणार आहे. तर पलटणने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केलाय. कॅप्टन हार्दिकने ऑलराउंडर मोहम्मद नबी याला बाहेर बसवलंय. तर नबीच्या जागी नमन धीर याचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. अर्थात रोहित शर्मा इमपॅक्ट प्लेअर म्हणून दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी येणार आहे.
दरम्यान मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण 32 सामने झाले आहेत. त्यामध्ये मुंबईचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने 23 सामने जिंकले आहेत. तर कोलकाताला 9 सामने जिंकण्यात यश आलंय. तर वानखेडेत उभयसंघात 10 सामने झालेत. त्या 10 पैकी 9 सामन्यात मुंबई यशस्वी ठरलीय. तर कोलकाताने 1 सामना जिंकलाय.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.
मुंबई इम्पॅक्ट प्लेअर्स : रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, ड्रेवाल्ड ब्रेविस आणि रोमॅरियो शेफर्ड.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
केकेआर इम्पॅक्ट प्लेअर : अनुकुल रॉय, मनीष पांडे, श्रीकर भारत, शेरफेन रदरफोर्ड आणि चेतन साकारिया.