MI vs SRH Confirmed Playing XI, IPL 2024 : मुंबईकडून एकाचं पदार्पण, हैदराबादच्या गोटात घातक बॅट्समनची एन्ट्री
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Confirmed Playing XI in Marathi : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण? पाहा
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकल्यानंतर चेसिंगचा निर्णय घेतला आहे. पंड्याने हैदराबादला बॅटिंगचं आमंत्रण दिलं आहे. मुंबई विरुद्ध हैदराबाद दोन्ही संघ 27 मार्चनंतर पुन्हा आमनेसामने आले आहेत. या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये हैदराबाद आणि मुंबई दोन्ही दोन्ही संघांनी बदल केले आहेत.
दोन्ही संघात बदल
मुंबईकडून एका युवा खेळाडूचं पदार्पण झालंय. अंशुल कंबोज याला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर मुंबईचा विकेटटेकर गोलंदाज गेराल्ड कोएत्झी प्लेईंग ईलेव्हनचा भाग नाही. तर हैदराबादने आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनुभवी फलंदाज मयंक अग्रवाल याचा समावेश केला आहे. मयंक अग्रवाल तिसऱ्या स्थानी खेळणार असल्याचं कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस दरम्यान सांगितलं. तर हैदराबादचा माजी कर्णधार एडन मारक्रम याला बाहेर बसवण्यात आलं आहे.
लसिथ मलिंगाकडून स्वागत
अंशुल कंबोज याला मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच आणि दिग्गज माजी गोलंदाज लसिथ मलिंगा यांनी सामन्याआधी कॅप दिली. मलिंगाने कंबोजचं अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळेस इतर सहकाऱ्यांनी अंशुलचं अभिनंदन केलं. आता अंशुल मिळालेल्या या संधीचा किती फायदा करुन घेतो, याकडे मुंबई टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.
अंशुल कंबोज याचं पदार्पण
Big day for our young fiery pacer! 🤩🔥
Go well, Anshul 💪#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvSRH pic.twitter.com/SERyMh5WH3
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2024
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.