PBKS vs RCB Confirmed Playing XI, IPL 2024 : आरसीबीतून ग्लेन मॅक्सवेल आऊट, चाहत्यांना धक्का
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Confirmed Playing XI in Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने करो या मरो सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध केलेल्या एका बदलामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. सॅम करन याच्याकडे पंजाबचं तर फाफ डु प्लेसीसकडे आरसीबीच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामनन्याचं आयोजन हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. पंजाबच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन सॅम करण याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत आरसीबीला बॅटिंगला भाग पाडलं आहे. प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा अखेरचा सामना आहे. दोघांसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे.
दोन्ही संघात 1-1 बदल
आरसीबी आणि पंजाब दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1-1 बदल केला आहे. पंजाबमध्ये लियाम लिविंगस्टोन यांचं कमबॅक झालं आहे. तर कगिसो रबाडा याला बाहेर बसवण्यात आलं आहे. टॉसवेळेस कॅप्टन सॅम करन याने याबाबतची माहिती दिली. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने घेतलेल्या एका निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आरसीबीने ग्लेन मॅक्सवेल याला बाहेर बसवलंय. तर त्याच्या जागी लॉकी फर्ग्यूसन याचा समावेश करण्यात आला आहे. आरसीबी आणि पंजाबसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा अखेरचा सामना आहे. अशा या सामन्यात आरसीबीने ऑलराउंडर मॅक्सवेलचा समावेश न केल्याने क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ग्लेन मॅक्सवेलला निर्णायक सामन्यातून वगळलं
🚨 PBKS opt to bowl against RCB in a do-or-die game for both teams in Dharamsala
🏏 RCB bring in Lockie Ferguson for Glenn Maxwell 🏏 PBKS pick Liam Livingstone in place of Kagiso Rabada#IPL2024 #PBKSvsRCB pic.twitter.com/crmnoowhOz
— Cricbuzz (@cricbuzz) May 9, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटीकपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि विद्वत कवेरप्पा.