IPL 2024, CSK vs DC : दिल्ली कॅपिटल्सचं चेन्नईसमोर 192 धावांचं आव्हान
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने आहेत. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 विकेट्स गमवून 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं आहे.
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. दिल्ली कपिटल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 191 धावा केल्या. तसेच चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. आता चेन्नई हे आव्हान गाठते की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सला डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ या जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी या दोघांनी 93 धावांची भागीदारी केली. डेविड वॉर्नरने 35 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. तर पृथ्वी शॉचं अर्धशतक 7 धावांनी हुकलं. त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्यानंतर सावधपणे खेळत कर्णधार ऋषभ पंतने डाव पुढे नेला. तसेच शेवटच्या षटकात 32 चेंडूत 51 धावांची खेळी केली.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मधल्या षटकात दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. पृथ्वी शॉ असो की ऋषभ पंत सावध फलंदाजी करताना दिसले. तर पथिरानाने एकाच षटकात दोघांचा त्रिफळा उडवत धावसंख्येवर आणखी ब्रेक लावला. पथिरानाने चांगली गोलंदाजी केली आणि 3 गडी बाद केले.
गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्लीने सुरुवातीचे दोन्ही सामने गमवल्याने नवव्या स्थानी आहे. आता या सामन्यातील निकालावर दिल्लीचं पुढची वाटचाल ठरणार आहे. हा सामना गमवल्यास दिल्लीचा पुढचा प्रवास कठीण होत जाणार आहे. दरम्यान या सामन्यातून कर्णधार ऋषभ पंतला लय सापल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. डेविड वॉर्नर म्हणाला की, “खरंतर धावफळकावर 200 धावा असायला हव्या होत्या.आम्ही मध्यंतरी दोन विकेट गमावल्या आणि बॅकफूटवर आलो. ऋषभ ज्या प्रकारे खेळला ते अभूतपूर्व होतं. पृथ्वीही खूप मेहनत घेत आहे.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.