IPL 2024, CSK vs DC : टॉस जिंकत दिल्लीने निवडली फलंदाजी, कर्णधार ऋषभ पंत म्हणाला…

आयपीएल स्पर्धेतील 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेत चेन्नईने सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहेत, तर दिल्लीला अजूनही विजयाची प्रतीक्षा आहे. असं असताना आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

IPL 2024, CSK vs DC : टॉस जिंकत दिल्लीने निवडली फलंदाजी, कर्णधार ऋषभ पंत म्हणाला...
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 7:08 PM

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. तर जवळपास एक वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात परतलेल्या ऋषभ पंतचं नशिब अजूनही फुटकं आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात त्याला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे दिल्ली विजयाचं खातं खोलून चेन्नई सुपर किंग्सचा विजयाचा रथ रोखणार का हा प्रश्न आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेत 29 वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचं कायमच दिल्लीवर भारी पडली आहे. चेन्नई सुपर किंग्सने 19, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने फलंदाजी निवडली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. विकेट चांगली दिसते, आम्हाला त्याचा बॅटिंग ट्रॅक म्हणून वापर करायचा आहे. स्कोअर बोर्डवर धावा करायच्या आहेत. आम्ही इथे आलो आणि या विकेटवर आम्हाला 10 दिवस मिळाले. संघात दोन बदल आहेत. कुलदीप ऐवजी संघात पृथ्वी शॉ आला आहे आणि रिकी भुई ऐवजी संघात इशांत शर्माला स्थान मिळालं आहे. आम्हाला फक्त चांगले क्रिकेट खेळायचे आहे.” चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, “इथे पहिला खेळ आहे. या खेळपट्टीची फारशी माहिती नाही. ते कसे आहे ते पाहूया. योजना तशीच आहे, गोष्टी सोप्या ठेवायच्या आहेत. आमच्या संघात कोणताही बदल नाही.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.