CSK vs KKR : कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या बाजूने टॉस, दोघांच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
CSK vs KKR Toss Updates In Marathi : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता असा सामना होणार आहे. हा या मोसमातील 22 वा सामना आहे. चेन्नई सुपर किंग्स एमए चिदंबरम स्टेडियम या घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलकाताला पहिले बॅटिंग करावी लागणार आहे.
चेन्नईच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल
चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये तब्बल 3 बदल केले आहेत. ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याला संधी देण्यात आली आहे. तर बांगलादेशचा वेगवान गोलंदाज व्हीझाचं काम आटपून परतला आहे. तर समीर रिझवी याचा समावेश करण्यात आला आहे. दीपक चाहर याला दुखापतीमुळे संधी मिळाली नाही. तर मथीशा पथीराणा उपलब्ध नाही. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन श्रेयस अय्यर याने कोणताही बदल न करता कोलकाताच्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास कायम ठेवला आहे.
चेन्नईची घरच्या मैदानातील आकडेवारी
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने झाले आहेत. चेन्नईने 31 पैकी 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाताने 11 वेळा विजयश्री मिळवली आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर चेन्नईन घरच्या मैदानात झालेल्या 10 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर कोलकाताने 3 वेळा चेन्नईला पराभूत केलंय.
चेन्नईने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss & elect to field against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/5lVdJVscV0#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/l0uaAhGnob
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन – श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षाना.