CSK VS PBKS : चेन्नईला घरच्या मैदानात लोळवलं, पंजाबचा 7 विकेट्सने धमाकेदार विजय

Chennai Super Kings vs Punjab Kings Match Result : पंजाब किंग्सचा हा या आयपीएलच्या 17 व्या मोसमातील चौथा विजय ठरला आहे.

CSK VS PBKS : चेन्नईला घरच्या मैदानात लोळवलं, पंजाबचा 7 विकेट्सने धमाकेदार विजय
shashank singh and sam curran,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 11:37 PM

सॅम करन याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने पंजाबसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 3 विकेट्स गमावून 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पंजाबचा हा चेन्नई विरुद्धचा सलग पाचवा विजय ठरला. तर या हंगामातील पंजाबचा चौथा विजय ठरला. तर दुसऱ्या बाजूला पराभवामुळे चेन्नईची प्लेऑफच्या हिशोबाने धाकधुक वाढली आहे.

पंजाबच्या पाचही फलंदाजांनी विजयात योगदान दिलं. पंजाबसाठी जॉनी बेयरस्टो याने सर्वाधिक धावा केल्या. जॉनीने 30 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्ससह 46 धावा केल्या. रायली रुसोने 43 धावांची खेळी केली. ओपनर प्रभसिमरन सिंह याने 13 धावा जोडल्या. तर शशांक सिंह आणि कॅप्टन सॅम करन या जोडीने पंजाबला विजयापर्यंत पोहचवलं. ही जोडी नाबाद परतली. सॅम करनने 26 धावा केल्या. तर शशांक सिहंने 25 रन्स केल्या. तर चेन्नईकडून शार्दूल ठाकुर, शिवम दुबे आणि रिचर्ड ग्लेसन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

चेन्नईची बॅटिंग

दरम्यान त्याआधी पंजाबने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी बोलावलं. पंजाबच्या गोलंदाजांनी कॅप्टन सॅम करन याच्या फिल्डिंग करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवलं. पंजाबच्या गोलंदाजांनी चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 162 धावांवर रोखलं. चेन्नईने 7 विकेट्स गमावल्या. चेन्नईकडून कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे याने 29 आणि समीर रिझवी याने 21 धावांचं योगदान दिलं. मोईन अली याने 15 आणि महेंद्रसिंह धोनीने 14 धावा जोडल्या. रवींद्र जडेजा याने 2 आणि डॅरेल मिचलने 1* धावा केली. तर शिवम दुबेला भोपळाही फोडता आला नाही. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चाहल या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दूल ठाकुर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन आणि मुस्तफिजुर रहमान.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.