IPL 2024, CSK vs RCB : रजत पाटीदारचं नशिब पुन्हा निघालं फुटकं, पहिल्याच सामन्यात नको ते करून गेला
आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जिंकला. कर्णधार फाफ डू प्लेसिसने क्षणाचाही विलंब न करता फलंदाजी निवडली आहे. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पण फाफ डुप्लेसिस बाद होताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅकफूटवर गेली.
आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. खेळपट्टीचा अंदाज असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फलंदाजीचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. पण पाचव्या षटकात नको तेच झालं. आक्रमकपणे खेळणाऱ्या फाफ डु प्लेसिसने चान्स घेतला आणि बाद झाला. मुस्तफिझुरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला. ही संधी पहिल्या खेळणाऱ्या रचिन रवींद्रने सोडली नाही आणि जबरदस्त झेल घेतला. यानंतर फाफची जागा भरून काढण्यासाठी रजत पाटीदार मैदानात उतरला. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्य. मात्र त्याला त्या पूर्म करता आल्या नाही. मुस्तफिझुरच्या दोन चेंडूंचा सावध सामना केला. मात्र तिसऱ्या चेंडूवर फटका मारताना नको ती चूक करून बसला. महेंद्रसिह धोनीने त्याचा जबरदस्त झेल घेतला.
रजत पाटीदारला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. मात्र तिथेही त्याचा फॉर्म हवा तसा नव्हता. त्यामुळे त्याला उर्वरित तीन सामन्यात डावलण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये कमबॅक करेल अशी आशा होती. मात्र त्याची या स्पर्धेतील सुरुवात एकदमच खराब झाली. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आयपीएलच्या 17 व्या पर्वात शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रजत पाटीदारने पदार्पण केलं होतं. पहिल्या डावात 72 चेंडूत 32 धावा केल्या. दुसऱ्या डावात 19 चेंडूत 9 धावा केल्या होत्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 5 धावा आणि दुसऱ्या डावात खातंही खोलता आलं नाही. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात खातंही खोलता आलं नाही. त्याचा फॉर्म पाहता पाचव्या कसोटीत त्याला डावलण्यात आलं होतं.
रजत पाटीदार बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात उतरला. मात्र त्यालाही आपलं खातं खोलता आलं नाही. अवघ्या एका चेंडूचा सामना केला आणि गोल्डन डकवर बाद झाला. चहरच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्हजमध्ये थेट चेंडू गेला. थलायवा महेंद्रसिंह धोनी कोणतीही चूक न करता सहज झेल घेतला आणि तंबूत पाठवलं. झटपट विकेट्स पडल्याने बंगळुरुची धावगती कमी झाली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज