IPL 2024, CSK vs RCB : सामन्यात या खेळाडूंकडे असेल विजयाची चावी! संभाव्य प्लेइंग इलेव्हन आणि इतर बाबी जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. 22 मार्चला हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे. या सामन्यात विजयाची चावी काही खेळाडूंच्या हाती असणार आहे. सामना पालटण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. चला जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना पालटण्याची ताकद काही खेळाडूंमध्ये आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 5, तर चेन्नई सुपर किंग्सच्या 6 खेळाडूंचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्सने मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी आतुर आहे. असं असताना या दोन्ही संघापैकी कोणता संघ वरचढ ठरणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल. पण या सामन्यात विजयाची चावी काही खेळाडूंच्या हाती असणार आहे. कोणत्याही क्षणी सामन्याचं रुपडं पालटण्याची ताकद या खेळाडूच्या हाती आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत हे खेळाडू कमाल करू शकतात. गेल्या वर्षभरातील त्यांचा फॉर्म पाहता यावरून अंदाज बांधता येईल. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा आमनेसामने असतील. दोन्ही संघ आतापर्यंत 31 सामने खेळले असून 20 सामन्यात सीएसकेने, तर 10 सामन्यात आरसीबीने बाजी मारली आहे. एक सामना अनिर्णित ठरला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मोहम्मद सिराज, कॅमरोन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली हे पाच खेळाडू आघाडीवर आहेत. या व्यतिरिक्त विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंह धोनीच्या तुलनेत दिनेश कार्तिक उजवा ठरेल. कारण मागच्या पर्वातील धोनीची फलंदाजी पाहता, त्यात तितकी धार नसल्याचं दिसून आलं आहे. पण दिनेश कार्तिकची बॅटही मागच्या पर्वात शांत होती. त्यामुळे या दोघांपैकी कोण चमकेल सांगता येत नाही.
चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि शार्दुल ठाकुर यांच्यावर मदार असेल. शिवम दुबेची चमक अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत दिसली आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात एशियन्स गेम्स स्पर्धेत विजय मिळवला आहे. दुसरीकडे शार्दुल ठाकुरने रणजी स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. त्यामुळे या खेळाडूंकडून अपेक्षा असतील.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, आकाश दीप.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संभाव्य प्लेइंग 11: ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली/समीर रिझवी, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान.