IPL 2024, CSK vs RCB : पावसामुळे षटकं कमी झाली तर कसं असेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर टार्गेट, जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून पराभूत करावं लागेल. पण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि षटकं कमी झालं तर कसं असेल गणित ते समजून घ्या.
आयपीएल 2024 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यातील निकाल प्लेऑफमधील चौथा संघ ठरवणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी सामना 18 धावांनी किंवा 18.1 षटकात दिलेलं टार्गेट पूर्ण करावं लागले. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हा सामना पावसामुळे झालाच नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि चेन्नईची प्लेऑफमध्ये एन्ट्री होईल. दुसरीकडे, पाऊस पडला आणि कमी षटकांचा खेळ झाला तर काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सचा नेट रनरेट हा आरसीबीपेक्षा खूपच चांगला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पुढचं गणित कसं असेल हे जाणून घेऊयात. चेन्नई सुपर किंग्स 14 गुणांसह चौथ्या आणि आरसीबी 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. चेन्नईला फक्त विजयाची गरज आहे. तर आरसीबीला विजयासह नेट रनरेटचं गणित सांभाळावं लागणार आहे.
दक्षिण कर्नाटकात 18 ते 20 मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 18 मे रोजी सामना होणार आहे. पावसाचा अंदाज खरा ठरला तर षटकं कमी केली जाऊ शकतात. यापूर्वी दोन सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हे सामने रद्द करण्यात आले होते आणि प्रत्येकी एक गुण दिला होता.
- 20 षटकांचा खेळ झाला त आरसीबीने 200 धावा केल्या तर चेन्नई सुपर किंग्सला 182 धावांवर रोखावं लागेल. चेन्नई सुपर किंग्सने 200 धावांचं लक्ष्य दिलं तर 18.1 षटकात पूर्ण करावं लागेल.
- 15 षटकांचा खेळ झाला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 170 धावा केल्या तर चेन्नईला 152 धावांवर रोखावं लागेल. चेन्नई सुपर किंग्सने 170 धावांचं टार्गेट दिलं तर हे लक्ष्य आरसीबीला 13.1 षटकात पूर्ण करावं लागेल.
- 10 षटकांचा खेळ झाला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करून 100 धावा केल्या तर चेन्नईला 82 धावांवर रोखावं लागेल. हेच टार्गेट चेन्नई सुपर किंग्सने दिलं तर 8.1 षटकात पूर्ण करावं लागेल.
- 5 षटकांचा सामना झाला आणि आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्सला 32 धावांवर रोखावं लागेल. दुसरीकडे, चेन्नईने हे टार्गेट दिलं तर 3.1 षटकात पूर्ण करावं लागेल.
वरील गणित पाहता कितीही षटकांचा खेळ झाला आणि कितीही धावा दिल्या. तर एकच सूत्र लागू होतं. ते म्हणजे दिलेलं टार्गेट 11 चेंडू राखून पूर्ण करायचं. याउलट चेन्नईला टार्गेट दिलं तर 18 धावांनी जिंकायचं.