IPL 2024, CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सने दिलं असं कारण, म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेतील 46व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद 78 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 3 गडी गमवून 212 धावा केल्या होत्या. मात्र सनरायझर्स हैदराबादचा संघ 134 धावा करू शकला.

IPL 2024, CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सने दिलं असं कारण, म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 11:54 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला दणका दिला. हैदराबादचे फलंदाज भलतेच फॉर्मात असताना पराभूत करणं खरंच खूप कठीण होतं. मात्र चेन्नई सुपर किंग्सने हा सामना एकतर्फी जिंकला. इतकंच काय तर 78 धावांनी सामना जिंकल्याने गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबादला दणका दिला आहे. सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबादची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात प्लेऑफची रंगत आणखी वाढणार आहे. कारण लखनौ, हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स यांचे समान दहा गुण असून नेट रनरेटचा काय तो फरक आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल गमवल्याने फलंदाजी वाटेला आली. त्यामुळे या सामन्यात हैदराबाद बाजी मारेल असंच वाटत होतं. मात्र घडलं भलतंच..ऋतुराज गायकवाडने केलेल्या 98 धावा आणि तुषार देशपांडेने घेतलेल्या 4 विकेट्स यामुळे हैदराबादचा संघ बॅकफूटवर गेला. हैदराबादला 20 षटकंही पूर्ण खेळता आली नाही. 19 व्या षटकात सर्वबाद 134 धावा करता आल्या आणि 78 धावांनी दारूण पराभव झाला. या सामन्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपलं मत व्यक्त केलं आहे.

“आम्हाला वाटले की जिंकण्याची ही आमची सर्वोत्तम संधी आहे. त्यांनी 210 पर्यंत मजल मारण्यासाठी चांगली फलंदाजी केली. पण आमच्या फलंदाजी लाइनअपमध्ये आम्हाला संधी मिळाली होती, खेळपट्टीही चांगली खेळत होती. फलंदाजीची क्रमवारी कशी चालली आहे याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. त्या लाइनअपमधील प्रत्येकाने स्पर्धेत कधीतरी खेळ केला आणि जिंकून दिला आहे. आता नक्कीच दव पडलं आहे पण पहिल्या डावातही तेच होते. पराभवातून शिकून आम्ही पुन्हा येऊ.”, असं हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.