IPL 2024, CSK vs SRH : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने जिंकला टॉस, पॅट कमिन्स गोलंदाजी निवडत म्हणाला…
आयपीएल स्पर्धेतील 46वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आहे. या सामन्यात हैदराबादचं पारडं जड आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्स मोक्याच्या क्षणी दणका देण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
आयपीएल स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगत आहे. या सामन्यातून चेन्नई सुपर किंग्स विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत दोन्ही संघात 20 सामने झाले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात चेन्नईने, तर 6 सामन्यात हैदराबादने बाजी मारली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेत दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यापूर्वी च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला 6 विकेट्स आणि 11 चेंडू राखून पराभूत केलं होतं. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 5 गडी गमवून 165 धावा केल्या होत्या. तर सनरायझर्स हैदराबादने 18.1 षटकात 4 गडी गमवून 166 धावा केल्या आणि विजय मिळवला. आता चेन्नई हैदराबाद सामना एमए चिदंमबरम मैदानात आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांना पूरक आहे. फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांना ही खेळपट्टी मदत करणारी आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला. पॅट कमिन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. नक्कीच, येथे खूप मोठा आवाज का आहे ते तुम्ही पाहू शकता. खेळाडू चक्क पम्प अप आहेत. आमच्याकडे भुवी आहे जो खूप छान नवीन बॉलने गोलंदाजी करतो. मी फक्त आवश्यक तिथे गोलंदाजी करतो. आम्ही आणखी एक बदल केला आहे मार्कंडे नाही. आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार केला आहे, कदाचित संध्याकाळी नंतर त्यात दव येईल.”
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, “नाणेफेक जिंकण्याची आशा होती, आम्ही काहीही नियंत्रित करू शकत नाही. जर आम्ही त्यांच्याविरुद्ध धावा केल्या तर ते नक्कीच दडपणाखाली असतील. आम्ही खेळातील क्लच क्षण गमावले आहेत, फक्त 2-3 षटके फलंदाजी करताना जेव्हा त्याचे आम्ही भांडवल करू शकलो नाही. गोलंदाजी करूनही, आम्ही पॉवरप्लेमध्ये ती सुरुवात केली नाही. आम्हाला असे वाटते की आम्ही चांगले करू शकलो नाही. एकंदरीत, आम्ही जिथे आहोत त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत परंतु आम्ही फक्त ते क्लच क्षण जिंकण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
दोन्ही संघांची प्लेइंग
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन