IPL 2024 , KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सला दणका, 106 धावांनी पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकात्याने जिंकला आणि तेव्हापासून पकड मिळवली ती शेवटपर्यंत राहिली. कोलकात्याने दिल्ली कॅपिटल्सला 107 धावांनी पराभूत केलं. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

IPL 2024 , KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्सला दणका, 106 धावांनी पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:23 PM

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला दणका दिला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. फलंदाजी करताना पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांवर भारी पडले. दिल्ली कॅपिटल्स संघ एका एका विकेटसाठी धडपड करताना दिसले. मात्र सुनील नरीनने त्यांना संधीच दिली नाही. तसेच चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सुनील नरीने 39 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. तर अंगरिश रघुवंशी याने 27 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. रसेलनेही आक्रमक खेळी करत 19 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकार मारत 41 धावा केल्या. कोलकात्याने 20 षटकात 7 गडी गमवून 272 केल्या आणि विजयासाठी 273 धावा दिल्या. पण दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात सर्व गडी गमवून 166 धावा करता आल्या. कोलकात्याने दिल्लीचा 106 धावांनी पराभव केला. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या 273 धावांचं आव्हान गाठताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. संघाच्या 21 धावा असताना पृथ्वी शॉ 10 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श आणि अभिषेक पोरेल यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. तर डेविड वॉर्नर स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दोन सामन्यानंतर स्टार्कला विकेट घेण्यात यश आलं हे विशेष. ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत काही अंशी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 25 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर अक्षर पटेल फलंदाजी आला. मात्र फक्त एक चेंडूसाठी हजेरी लावून शून्यावर बाद झाला.  त्यानंतर तळाचे फलंदाजही झटपट बाद होत गेले आणि 107 धावांनी दारूण पराभव झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.