IPL 2024, DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सच्या दारुण पराभवानंतर ऋषभ पंतने दिलं असं कारण, म्हणाला…

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 272 धावा केल्या आणि विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. मात्र दिल्लीचा संघ सर्वबाद 166 धावा करू शकला. या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. रनरेटवर प्रभाव पडल्याने गुणतालिकेत घसरण झाली आहे.

IPL 2024, DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सच्या दारुण पराभवानंतर ऋषभ पंतने दिलं असं कारण, म्हणाला...
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:57 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या वाटेला तिसरा पराभव आला आहे. इतकंच काय तर 106 धावांनी पराभव झाल्यान नेट रनरेटही खराब झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेत आतापर्यंत एकूण 4 सामने खेळली आहे. चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात तर नेट रनरेट पूर्णत: खराब झाला आहे. त्यामुळे थेट नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. नेट रनरेट हा -1.347 इतका झाला आहे. त्यामुळे पुढे नुसता विजय मिळवून नाही तर रनरेटही सुधारावा लागणार आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सला नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. दिल्लीला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने थेट अव्वल स्थान गाठलं आहे. 6 गुण आणि +2.518 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. असं सर्व चित्र असताना या पराभवाचं विश्लेषण दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने केलं आहे. डीआर रिव्ह्यूबाबत त्याने आपली मत मांडलं आहे. नेमकं काय झालं आणि त्याचं कारण काय हे सर्वकाही स्पष्ट केलं.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, “आम्ही अधिक चांगलं करू शकलो असतो. हा एक त्या दिवसांपैकी एक आहे. फलंदाजी करताना आम्ही लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करत होतो. पाठलाग न करता चांगला प्रयत्न करणं हा होता. गोलंदाजीवेळी स्क्रिनवर टायमर पाहू शकलो नाही. स्क्रिनमध्ये काही समस्या देखील होती. पण काही गोष्टी तुमच्या हातात असतात आणि काही नाही. तुम्हाला फक्त प्रवाहासोबत जाणं गरजेचं आहे. आता पुढील सामन्यात आणखी चांगलं करण्याची गरज आहे. नक्कीच आम्ही पुनरागमन करू.”

दुसरीकडे, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, “खरं सांगायचं तर आम्हाला 210-220 पर्यंत मजल मारू असं वाटत होतं. पण 270 म्हणजे केकवर चेरी ठेवल्यासारखं होतं. मी सामन्यापूर्वीच सांगितलं होतं की सुनीलचं काम चांगली सुरुवात करून देण्याची आहे. पण त्याने तसं केलं नाही केलं तरी चालेल. रघुवंशी खरंच निडरपणे खेळला. त्याने ज्या प्रकारे फटकेबाजी केली ती अप्रतिम होती. दुसरीकडे, गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली.”

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.