DC vs KKR : दिल्ली कोलकात्याच्या या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, वाचा कोण कोण आहेत यादीत
आयपीएल स्पर्धेत 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा चौथा, तर कोलकाता नाईट रायडर्सचा हा तिसरा सामना आहे. त्यामुळे साखळी फेरीतील चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. तीन टप्प्यात राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सला टॉप 4 मध्ये आहेत.
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. आयपीएल स्पर्धेतील हा 16 वा सामना असून गुणतालिकेतील चुरस वाढली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ स्पर्धेत 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यात दिल्ली कॅपिटल्सने 15 वेळा, कोलकाता नाईट रायडर्सने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. आता दोन्ही संघ विझागमध्ये आमनेसामने येणार आहेत. या मैदानात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे कोलकात्याला सावधपणे खेळावं लागणार आहे. पहिल्या डावात 190 पेक्षा जास्त धावा झाल्या तर वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूने स्विंग मिळाला होता. या सामन्यातही परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाठलाग करणे थोडे कठीण होऊ शकते.
दिल्ली कॅपिटल्सचे 6, तर कोलकाता नाईट रायडर्सच्या 5 खेळाडूंवर सामन्याची मदार असणार आहे. दिल्लीचे ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, अक्षर पटेल आणि खलील अहमद सामना फिरवू शकतात. तर कोलकाता नाईट रायडर्सचे फिल सॉल्ट, वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा हे महत्त्वाचे खेळाडू ठरतील.
कोलकाता नाईट रायडर्स होमग्राउंड आणि दुसऱ्या ठिकाणीही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या तुलनेत या स्पर्धेत कोलकात्याचं पारडं जड आहे. कोलकात्याची मधली फळी एकदम स्ट्राँग आहे. तर दिल्लीने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत स्पर्धेत एक चमक दाखवली आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, सुनील नरेन, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती