IPL 2024, DC vs LSG : दिल्लीकडून पराभव झाल्यानंतर केएल राहुलने सर्वकाही केलं उघड, सांगितलं नेमकं काय झालं?
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत आता लखनौ सुपर जायंट्ससाठी खूपच कठीण झाली आहे. दिल्लीविरुद्धचा सामना गमवल्याने आता प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीणच आहे. कारण नुसता पराभव नाही तर नेट रनरेटही पडलेला आहे. त्यामुळे पुढचा सामना जिंकून 14 गुण मिळवून फारसा फायदा होणार आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफचं गणित खूपच कठीण झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून 19 धावांनी पराभव झाल्यानंतर आता जवळपास आशा संपुष्टात आल्या आहेत. आता मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विजयासह -0.787 सुधारणं खूपच कठीण आहे. त्यात टॉप चारमध्ये असलेल्या संघांचे 14 गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सही 14 गुण आणि -0.377 पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि हैदराबाद मोठ्या फरकाने पराभूत झाले तरच संधी मिळू शकते. पण हे गणित जुळून येणं खूपच कठीण आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात खूपच जोर लावावा लागेल. पण हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आहे. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र विजयासह शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे सर्वकाही चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यावर अवलंबून असणार आहे. दरम्यान या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार केएल राहुल याने मन मोकळं केलं आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने सांगितलं की, “मला असे वाटते की 40 षटकांपर्यंत खेळपट्टीत काहीच बदल झाला नाही. जेव्हा आम्ही पहिल्या षटकात जेक फ्रेझरला बाद केले तेव्हा आम्हाला दिल्लीवरील दबाव पुढे न्यायला हवा होता. पण होप आणि पोरेल यांनी चांगली भागीदारी केली. आम्ही शेवटी चांगली कामगिरी केली आणि 200 ही एकूण धावसंख्या होती. आम्ही धावांचा पाठलाग करायला हवा होता. संपूर्ण हंगामात ही एक समस्या राहिली आहे. पॉवरप्लेमध्ये आम्ही अनेक विकेट गमावत राहतो. आम्हाला स्टॉइनिस आणि पूरन यांच्यासारखी कधीही ठोस सुरुवात करता आली नाही. हेच आम्ही या स्थितीत असण्याचे मोठे कारण आहे.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद.