IPL 2024, DC vs LSG : लखनौ सुपर जायंट्सने जिंकला नाणेफेकीचा कौल आणि निवडली गोलंदाजी, प्लेऑफच्या दिशेने कोण टाकणार पाऊल?
आयपीएल 2024 स्पर्धेतील 64वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पण लखनौने हा सामना गमवावा असं इतर संघांच्या चाहत्यांना वाटत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा एक आणि लखनौचे दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत खऱ्या अर्थाने चुरशीची झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हा त्या साखळीचा एक भाग आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. दिल्लीच्या तुलनेत लखनौ सुपर जायंट्सला प्लेऑफसाठी चांगली संधी आहे. या सामन्यात लखनौने विजय मिळवला तर 14 गुण होतील. तसेच पुढच्या सामन्यात 16 गुण करण्याची संधी आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. पण सर्व काही इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. दरम्यान लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या स्पर्धेत दुसऱ्यांदा भिडणार आहेत. यापूर्वीचा सामना दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्स आणि 11 चेंडू राखून जिंकला होता. दरम्यान नाणफेकीची कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला. कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केएल राहुलने नाणेपेकीनंतर सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आमच्या संघाला काय मदत करेल यामुळेच हा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे तरुण गोलंदाजी आहे आणि त्यांना लवकर खेळात आणू, आमच्याकडे अनुभवी फलंदाज आहेत आणि ते दडपण घेऊ शकतात. आमच्यासाठी हे अगदी स्पष्ट आहे, आम्हाला दोन्ही सामने जिंकायचे आहेत. गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही अचूक कामगिरी करू शकलो नाही आणि खेळातून बाहेर पडलो. गोलंदाजांनी धाडसी असणे आवश्यक आहे, एक गोलंदाजी एकक म्हणून तुम्हाला चेंज अप वापरण्याची भीती वाटू शकते परंतु त्यांना स्वतःला परत करावे लागेल. संघात दोन बदल आहे.”
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितलं की, “आम्ही प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं असतं. बऱ्याच गोष्टी चालू आहेत, पण तुम्ही फक्त गेम जिंकण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. जर तुम्ही खूप विकेट्स गमावल्या नसत्या तर आम्ही तो सामना जिंकला असता, पण हे सांगणे सोपे आहे. संपूर्ण हंगामात ही चिंता असते पण एक कर्णधार म्हणून तुम्ही खेळाडूंना त्यांचे सर्वोत्तम देण्यास सांगू शकता आणि ते ते करत आहेत. आमच्यात दोन बदल असून मी आणि नायब आलो आहेत. तर वॉर्नर संघात नसेल.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद.