DC vs MI : Jake Fraser-McGurk चं विस्फोटक अर्धशतक, जसप्रीत बुमराहची धुलाई
Jake Fraser McGurk fifty : दिल्ली कॅपिट्ल्सच्या जेक फ्रेझर-मॅकगर्क या युवा फलंदाजाने मुंबई विरुद्ध जोरदार सुरुवात करत झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचा युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क याने मुंबई इंडियन्स विरुद्ध विस्फोटक बॅटिंग करत झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. जेक फ्रेझर-मॅकगर्कने चौथ्या ओव्हरदरम्यानचं अर्धशतक झळकावलं. जेक फ्रेझर-मॅकगर्कने या दरम्यान मुंबईचा आणि क्रिकेट विश्वातील सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह याची सुद्धा धुलाई केली. जेक फ्रेझर-मॅकगर्कने अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं.
मॅकगर्कने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. मॅकगर्कने 346.67 च्या वादळी स्ट्राईक रेटने अवघ्या 15 बॉलमध्ये 3 षटकार आणि 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. मॅकगर्कने या दरम्यान दुसऱ्या ओव्हरमध्ये सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह याचीही धुलाई केली. मॅकगर्कने बुमराहच्या या ओव्हरमध्ये 16 धावा मिळवल्या. मॅकगर्कने या अर्धशतकासह आपल्याच विक्रमाची बरोबरी केली. मॅकगर्कने याआधी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धही 15 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.
मॅकगर्क अर्धशतकानंतर आणखी विस्फोटक बॅटिंग करु लागला. मॅकगर्कला आयपीएलमध्ये वेगवान शतकांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती. मॅकगर्कने त्यानुसारच चाबूक बॅटिंग करत होता. मात्र पीयूष चावला याने मॅकगर्क याला रोखलं आणि मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. चावलाने मॅकगर्कला मोहम्मद नबी याच्या हाती कॅच आऊट केलं. मॅकगर्कने 27 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 311.11 च्या स्ट्राईक रेटने 84 धावांची खेळी केली.
जेक फ्रेझर-मॅकगर्कचं झंझावाती अर्धशतक
Enjoying the Fraser-McGurk show 🍿
A 1️⃣5️⃣ ball 5️⃣0️⃣ for the dashing opener as he equals his own record for the fastest fifty of the season 💪
Follow the Match ▶️ https://t.co/BnZTzctcaH#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/hcnAwGhbg9
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
दरम्यान जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. या दरम्यान मॅकगर्क आणि पोरेल या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार आणि खलील अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.