DC vs MI : हार्दिकची जोरदार धुलाई, 2 ओव्हरमध्ये 41 धावा, कॅप्टनकडून मुंबईच्या अडचणीत भर
Hardik Pandya Mumbai Indians DC vs MI : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक इकॉनॉमी रेटने धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने बॅटिंगच्या मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेत तडाखेदार सुरुवात केली. अभिषेक पोरेल आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क या सलामी जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना झोडून काढला. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने चौथ्या ओव्हर दरम्यान अर्धशतक ठोकलं. तसेच मॅकगर्क आणि पोरेल या सलामी जोडीने 7.3 ओव्हरमध्ये शतकी भागीदारी केली. पोरेल-मॅकगर्क या दोघांनी 114 धावांची भागीजारी केली. या दरम्यान दोघांनी विस्फोटक फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी केली. जेक फ्रेझर-मॅकगर्क याने तर मुंबईचा नंबर 1 गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही सोडलं नाही. तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्या यालाही चांगला झोडला.
हार्दिक पंड्या याने अवघ्या 2 ओव्हरमध्ये पाण्यासारख्या धावा लुटवल्या. पंड्याने 2 ओव्हरमध्ये एकूण 41 धावा दिल्या. पंड्याने दिल्ली विरुद्ध मुंबईच्या डावातील पाचवी आणि सातवी ओव्हर टाकली. पंड्याने पाचव्या ओव्हरमध्ये 20 आणि सातव्या ओव्हरमध्ये 21 धावा देल्या. पंड्याने एकूण 2 ओव्हरमध्ये 20.50 च्या इकॉनॉमी रेटने या धावा दिल्या. हार्दिक यानंतर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
हार्दिकच्या पाचव्या ओव्हरमध्ये जेक फ्रेझर-मॅकगर्क याने 2 सिक्स आणि 2 फोर ठोकले. त्यानंतर सातव्या ओव्हरमधल पहिल्या 5 बॉलमध्ये अभिषेक पोरेल याने 4,6 आणि 5 धावा मिळवल्या. तर जेक फ्रेझर-मॅकगर्क याने अखेरच्या बॉलवर सिक्स ठोकला. हार्दिकने अशाप्रकारे सातव्या ओव्हरमध्ये 21 धावा दिल्या.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार आणि खलील अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.