IPL 2024 : ईशान किशनला मोठा झटका, बीसीसीआयकडून कारवाई, काय झालं?
Ishan Kishan DC vs MI : मुंबईचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात 14 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 20 धावांची खेळी केली.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी वार्षिक करार जाहीर केला होता. बीसीसीआयने त्या वार्षिक करारातून ईशान किशन याची हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता ईशान किशन याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळते? याकडे लागून राहिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान बीसीसीआयने ईशान किशनवर मोठी कारवाई केली आहे. नक्की काय झालंय? बीसीसीआयने कारवाई का केली? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 43 व्या सामन्यात शनिवारी 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्यात ईशान किशनने केलेल्या एका चुकीमुळे त्याच्यावर बीसीसीायने दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे बीसीसीआयने ईशानला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून ठोठावली आहे. आयपीएलने याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
ईशान किशनकडून आयपीएलच्या आचारसहिंतेचं उल्लंघन झालं. ईशानला या आचासंहितेच्या लेव्हल वननुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे ईशानला 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे. आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकानुार, ईशानने आचार संहितेच्या 2.2 च्या उपकलम 1 चं उल्लंघन केलंय. ईशानने सामन्यानंतर सामनाधिकाऱ्यांसमोर आपली चूक मान्य केली. त्यामुळे पुढील कारवाई टळली. सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो. आचार संहितेच्या 2.2 च्या उपकलम 1 मध्ये जाहीरात-इतर वस्तूंचं नुकसान करणं आणि क्रिकेट उपकरणांचा दुरपयोग केल्यास कारवाईची तरतूद आहे.
ईशान किशन याच्यावर बीसीसीआयची मोठी कारवाई
Ishan Kishan, Wicketkeeper-batter, Mumbai Indians has been reprimanded and fined 10 per cent of his match fees for breaching the IPL Code of Conduct during Match 43 of the TATA Indian Premier League (IPL) 2024 against Delhi Capitals at the Arun Jaitley Stadium, Delhi on April 27,… pic.twitter.com/vBT4KbTbWo
— ANI (@ANI) April 28, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार आणि खलील अहमद.