DC vs MI : कॅप्टन हार्दिकचा पारा चढला, नक्की कुणावर भडकला? व्हीडिओ व्हायरल
Hardik Pandya Angry : दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या हा चांगलाच संतापलेला दिसून आला. नक्की काय झालं? जाणून घ्या.
दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 42 वा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने जोरदार तडाखेदार बॅटिंग केली. दिल्लीने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत 10 ओव्हरमध्ये 128 पर्यंत मजल मारली. दिल्लीची ही फटकेबाजी पाहून मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या टेन्शमध्ये आला. दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी फिल्डिंग कशी लावायची, असा प्रश्न हार्दिकसमोर होता. रोहित शर्माने या क्षणी हार्दिकला मदत केली. इतकंच नाही, तर हार्दिक या दरम्यान एका मुद्द्यावरुन थेट अंपायरसह भिडला. हार्दिक अंपायरवर संतापल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
नक्की काय झालं?
दिल्लीच्या आक्रमक सुरुवातीमुळे कॅप्टन हार्दिक पंड्या आधीच टेन्शमध्ये होता. हार्दिकची विकेट मिळत नसल्याने चिडचिड झाली होती. त्यानंतर विकेट मिळाली. मात्र दिल्लीच्या दुसऱ्या फलंदाजाला मैदानात येण्यास विलंब झाला. त्यामुळे हार्दिक संतापला. हार्दिक पंचाकडे गेला आणि याबाबत तक्रार केली. हार्दिक या दरम्यान पंचासह वाद घालत असल्याचंही म्हटलं जात आहे.
नियमानुसार, फिल्डिंग करणाऱ्या टीमला ठरवून दिलेल्या वेळेत डाव संपवायचा असतो. याची संपूर्ण जबाबदारी ही फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनवर असते. संबंधित टीम ठराविक वेळेत संबंधित षटकांचा खेळ संपवू शकली नाही, तर कॅप्टनवर स्लो ओव्हर रेटनुसार, दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे हार्दिकने दिल्लीचा फलंदाज मैदानात विलंबाने आल्याने नाराजी व्यक्त करत अंपायरकडे तक्रार केली.
व्हायरल व्हीडिओ
Bro Hardik Pandya has completely lost it 🤑🤑pic.twitter.com/4GsNpqU7ES#DCvsMI
— Utkarsh (@utkarshh_tweet) April 27, 2024
रोहितकडून फिल्ड सेट
Hardik Pandya standing on the boundary. Leader Rohit Sharma is setting the field.
This is a proper cinema ! 😭🔥pic.twitter.com/dbe325qvFE
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 𝕏 (@ImHydro45) April 27, 2024
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार आणि खलील अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.