IPL 2024, DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्सने पंजाबसमोर विजयासाठी ठेवलं 175 धावांचं आव्हान, पोरेलचा पडला इम्पॅक्ट

आयपीएल 2024 स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 9 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. आता पंजाब किंग्स दिल्लीने दिलेलं आव्हान गाठणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

IPL 2024, DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्सने पंजाबसमोर विजयासाठी ठेवलं 175 धावांचं आव्हान, पोरेलचा पडला इम्पॅक्ट
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 6:10 PM

आयपीएल स्पर्धेत 33 व्यांदा आणि 17 व्या पर्वात पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 32 सामन्यात 16 सामन्यात विजय आणि 16 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं एकमेकांना समतुल्य आव्हान आहे. सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 9 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. आता हे आव्हान पंजाब किंग्स गाठतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दिल्लीच्या मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली. तीन षटकात या दोघांनी 39 धावांची भागीदारी केली होती. मात्र चौथ्या षटकात मिचेल मार्शची विकेट पडली. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि शाई होपची जोडी जमली. या जोडीने 33 धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी फोडण्यात हर्षल पटेलला यश आलं. त्याने डेविड वॉर्नरला तंबूत पाठवलं. त्यानंतर सर्वांना प्रतिक्षा असलेला ऋषभ पंत तंबूत उतरला. त्याने 12 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. पण पुढच्याच चेंडूवर हर्षल पटेलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेच्या 7 षटकांत एक गडी गमावून 68 धावा केल्या. पंजाब किंग्सकडून हर्षल पटेलने चांगली गोलंदाजी टाकली. हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंहने 1-1, तर हर्षलने 2 गडी बाद केले. पंजाब किंग्सकडून हर्षल पटेलने तीन षटकं चांगली टाकली. पण शेवटच्या षटकात अभिषेक पोरेलने धू धू धुतला. शेवटच्या षटकात 25 धावा दिल्या. अभिषेक पोरेलने 10 चेंडूत 32 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.

शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.