DC vs SRH : दिल्लीने टॉस जिंकला, पहिले बॅटिंग कुणाची? पाहा प्लेईंग ईलेव्हन
Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Toss : दिल्ली कॅपिट्ल्सचा हा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सातवा आणि दिल्ली कॅपिट्ल्सचा आठवा सामना आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आल आहे. ऋषभ पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादची धुरा आहे. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्ली कॅप्टन ऋषभ पंतने या टॉस जिंकला. पंतने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. त्यामुळे आता दिल्लीच्या गोलंदाजांसमोर हैदबादची विस्फोटक बॅटिंगला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद एकूण 23 वेळा आमनेसामने आले आहेत. या 23 पैकी सर्वाधिक 12 सामन्यात सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्सवर विजय मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सने 11 सामने जिंकले आहेत. तसेच उभयसंघात गेल्या 5 सामन्यांमध्ये दिल्लीने 4 वेळा विजय मिळवलाय. तर हैदराबादला एक सामना जिंकण्यात यश आलंय. तर उभयसंघात दिल्लीत एकूण 6 सामने झाले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात हैदराबाद यशस्वी ठरलीय. तर दिल्लीला एकच सामना जिंकता आला आहे.
कुणाला संधी कुणाला डच्चू?
दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्सने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. सुमीत आणि इशांत शर्मा या दोघांच्या जागी टीममध्ये ललित यादव आणि एनरिच नॉर्तजे या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. तर पॅट कमिन्सने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवत प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दिल्लीने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
Delhi Capitals win the toss and elect to field against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/LZmP9Tevto#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/IWtNBxr6Vj
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
दिल्ली प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.