DC vs SRH : 4 षटकार 7 चौकार, हेडचा हाहाकार, हैदराबाद विरुद्ध विक्रमी अर्धशतक
Travis Head Fifty DC vs SRH IPL 2024 : ट्रेव्हिस हेड याने इतिहास रचला आहे. ट्रेव्हिस हेड याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात तोडू खेळी करत विस्फोटक आणि विक्रमी अर्धशतकी ठोकलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान फलंदाज ट्रेव्हिस हेड याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आपला तडाखा कायम ठेवत 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध झंझावाती खेळी केली आहे. दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना हा अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी बोलावलं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली. हेडने सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. हेडने तिसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चौकार ठोकला. यासह हेड आणि शर्मा या दोघांनी2.4 ओव्हरमध्ये 50 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर याच ओव्हरमधील उर्वरित 2 बॉलवर हेडने फोर आणि सिक्स ठोकला. हेडने यासह अर्धशतक पूर्ण केलं.
हेडचं विक्रमी अर्धशतक
ट्रेव्हिस हेड याने अवघ्या 16 बॉलमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 337.50 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक झळकावलं. हेडच्या आयपीएल कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक विक्रमी ठरलं. हेड हैदराबादसाठी संयुक्तरित्या कमी बॉलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. हेडच्या आधी त्याचा सलामी सहकारी अभिषेक शर्मा यानेच 16 बॉलमध्ये या हंगामात मुंबई विरुद्ध ही कामगिरी केली होती.
पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा
दरम्यान ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी पाचव्याच ओव्हरमध्ये शतकी सलामी भागीदारी केली. या सलामी जोडीने 5 ओव्हरमध्ये 103 धावा केल्या. हेडचं या भागीदारी 62 आणि अभिषेकचं 40 धावांचं योगदान राहिलं . त्यानंतर या दोघांनी सहाव्या ओव्हरचा खेळ संपल्यांतर एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारी टीम ठरली. हैदराबादने केकेआरचा रेकॉर्ड ब्रेक केला. हैदराबादने बिनबाद 125 धावा केल्या आणि केकेआरचा 105 धावांचा पावर प्लेमधील विक्रम मोडीत काढला.
ट्रेव्हिस हेडचा झंझावात
TRAVIS HEAD SMASHED JOINT FASTEST FIFTY IN SRH HISTORY 🤯 pic.twitter.com/cfEnP038FF
— Johns. (@CricCrazyJohns) April 20, 2024
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.
सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.