आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स मालकाची मोठी घोषणा, ऋषभ पंतबाबत घेतला असा निर्णय

आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 22 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच दहा संघांनी कंबर कसली आहे. 17 दिवसांच्या पहिल्या टप्प्यात एकूण 22 सामने खेळले जाणार आहे. या वेळापत्रकानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी ऋषभ पंतबाबत मोठी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात ऋषभ पंतच्या भूमिकेबाबत स्पष्ट सांगितलं आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स मालकाची मोठी घोषणा, ऋषभ पंतबाबत घेतला असा निर्णय
आयपीएल स्पर्धेपूर्वी ऋषभ पंतबाबत मोठी बातमी, दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने स्पष्टच सांगितलं की..
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 3:14 PM

मुंबई : आयपीएल स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं असून दहा संघ सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा घोळ कायम असल्याने बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी केलं आहे. 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं असून 7 एप्रिलपर्यंत सामने खेळले जातील. आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होताच दिल्ली कॅपिटल्सने संघाने एक मोठी घोषणा केली आहे. या पर्वात ऋषभ पंतची नेमकी भूमिका काय असेल याबाबत सांगितलं आहे. रस्ते अपघातामुळे ऋषभ पंत गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. आता यंदाच्या पर्वात खेळणार की नाही याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायसीचे मालकाने ईएसपीएल क्रिकइन्फोशी बोलताना बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

“ऋषभ पंत फलंदाजी करत आहे. तसेच त्याला धावण्यातही काही अडचण नाही. विकेटकीपिंगही सुरु केली आहे. तो आयपीएलसाठी पूर्णपणे फिट होऊन जाईल. मला आशा आहे की, ऋषभ पंत आयपीएल खेळणार आणि पहिल्या सामन्यापासून संघाचं कर्णधारपद भूषविणार आहे. पहिल्या सात सामन्यात तो फक्त फलंदाज म्हणून मैदानात उतरेल. त्याला शरीर कशाप्रकारे साथ देत यावर आयपीएलच्या बाकी सामन्यांबाबत निर्णय घेतला जाईल.”, असं दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने सांगितलं.

“ऋषभ पंतच्या आगमनाने संघात एक बॅलेन्स येईल. आमचा एक चांगला संघ आहे. ट्रिस्टन स्टब्ससारख्या खेळाडूंसह खूप सारे पर्याय आहेत. त्यांनी दक्षिण अफ्रिका 20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं. ऋषभ पंतशिवाय एनरिक नॉर्सिया दुखापतीने त्रस्त आहे. पाठीच्या दुखापतीमुळे नोर्कियाने अलीकडील अनेक सामने खेळला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 23 मार्चला पंजाब किंग्सशी मोहालीत होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ : ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर , विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ , एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल , लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद , मिचेल मार्श , इशांत शर्मा , यश धुल, मुंडे कुमार, हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप,स्वस्तिक छिकारा.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.