IPL Eliminator, RCB vs RR : राजस्थानने जिंकला नाणेफेकीचा कौल, संजू सॅमसन गोलंदाजी घेत म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावणार यात शंका नाही. दरम्यान नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला आणि संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

IPL Eliminator, RCB vs RR : राजस्थानने जिंकला नाणेफेकीचा कौल, संजू सॅमसन गोलंदाजी घेत म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 7:11 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील महत्त्वाचा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यातील विजेता संघ क्वॉलिफायर 2 फेरीत सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतं याची उत्सुकता लागून आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग सहा सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे विजयाची गती पाहता बंगळुरुला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सची या स्पर्धेतील सुरुवात खूप चांगली झाली. सुरुवातीला 8 सामने जिंकून प्लेऑफमधलं स्थान निश्चित केलं. मात्र त्यानंतर राजस्थानची गाडी विजयाच्या ट्रॅकवरून घसरली. सलग चार सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला कमबॅक करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

संजू सॅमसनने सांगितलं की, “परिस्थिती आणि विकेट बघून प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. काल रात्री दव पडले होते. हे सर्व मानसिकतेबद्दल आहे. या शानदार स्टेडियममध्ये येऊन खेळण्यासाठी खरोखरच उत्सुक आहे. इथे बरीच उर्जा आहे. क्रिकेटने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. जेव्हा तुमचे वाईट दिवस असतात तेव्हा आत्मविश्वास हवा. फिटनेस आणि दुखापती हे आव्हानात्मक भाग आहेत. हेटमायरला प्लेइंग इलेव्हमध्ये घेतलं आहे.”

फाफ डु प्लेसिसने सांगितलं की, “आम्हीही गोलंदाजी घेतली असती. काल रात्रीचा खेळ पाहिल्यावर सीम बॉलर्सना लवकर मदत मिळाली. खेळपट्टी वरच्या बाजूला कोरडी दिसत आहे. आमची आहे तीच मानसिकता आहे. आपल्या स्वतःच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत. आपण ज्या प्रकारे खेळू इच्छिता त्यावर प्रत्यक्षात उतरणं गरजेचं आहे. सीएसकेविरुद्धचा शेवटचा सामना अविश्वसनीय होता. जेव्हा तुम्ही बाद फेरीत पोहोचता तेव्हा तुम्हाला सुपरमॅन व्हायला हवे असे लोकांना वाटते. तोच संघ घेऊन उतरणार आहोत.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार ), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.