RCB vs RR : आरसीबीची क्वॉलिफायर 2 फेरीची वाट चुकली, राजस्थानकडून 4 गडी राखून पराभव
आयपीएल 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 4 गडी राखून पराभूत केलं. या पराभवासह आरसीबीचा जेतेपदाचा प्रवास येथेच थांबला. 17 व्या पर्वातही आरसीबीची झोळी रितीच राहिली आहे. आता पुढच्या पर्वात पुन्हा एकदा त्या अपेक्षेने मैदानात उतरावं लागेल.
आयपीएल 2024 स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्वप्न भंगलं आहे. साखळी फेरीत सुरुवात निराशाजनक राहिली. मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक करत आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सशी सामना झाला. या सामन्यात आरसीबीकडून हवी तशी कामगिरी झाली नाही. नाणेफेक गमवल्याने पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करत आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. राजस्थान रॉयल्ससाठी हे सोपं आव्हान होतं. त्यामुळे हा सामना पहिल्या डावानंतर राजस्थानच्या पारड्यात पडला होता. त्याच आरसीबीच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे राजस्थान रॉयल्सचा फायदा झाला. राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. आता राजस्थान रॉयल्सचा क्वॉलिफायर 2 फेरीत सनरायझर्स हैदराबादशी सामना होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे. त्यामुळे आता अंतिम फेरी कोण गाठतं याचीही उत्सुकता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांची हवी तशी करता आली नाही. विराट कोहली, रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोर यांनी त्यातला त्यात बरी फलंदाजी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. विराट कोहलीने 24 चेंडूत 33, रजत पाटिदारने 22 चेंडूत 34 आणि महिपाल लोमरोरने 17 चेंडूत 32 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या आर अश्विन आणि आवेश खानने आरसीबीला बॅकफूटवर ढकललं. आवेश खानने 4 षटकात 44 धावा दिल्या पण 3 गडी बाद केले. तर आर अश्विनने 4 षटकात फक्त 19 धावा देत 2 महत्त्वाचे गडी बाद केले. तर बोल्ट, संदीप शर्मा आणि चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार ), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.