IPL 2024 Full Schedule : आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं उर्वरित वेळापत्रक जाहीर, फायनल कधी?
IPL 2024 Playoffs Schedule In Marathi : आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. जाणून घ्या तुमच्या संघाचे सामने कधी आणि कुठे?
क्रिकेट चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीरं केलं होतं. त्यानंतर लोकसभेचं वेळापत्रक जाहीर झालं. त्यामुळे आता सर्व चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उर्वरित हंगामातील वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे. तसेच प्लेऑफ सामन्याचंही शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलं आहे. बीसीसीआयने 22 फेब्रुवारी रोजी 17 व्या हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल या 17 दिवसांमध्ये 21 सामन्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं. त्यानंतर आता उर्वरित सामन्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं गेलंय. दुसऱ्या टप्प्याला 8 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा
क्रिकेट चाहत्यांना बीसीसीआयने मोठा दिलासा दिला आहे. या हंगामातील एकूण 74 सामने हे भारतातच होणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकींमुळे सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल स्पर्धेचं आयोजन हे भारताबाहेर करण्यात आलं होतं. यंदाही भारतात सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सामने विदेशात होणार असल्याची चर्चा होती. मात्र सामने भारतातच होणार असल्याने चाहत्यांसाठी ही एक गूड न्यूज आहे.
17 व्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक
The wait is finally over! 😍
Here’s the complete TATA #IPL2024 schedule! Mark your calendars 📅 and don’t miss out on the non-stop cricket excitement 🔥
Tune-in to #IPLOnStar, LIVE, Only on Star Sports pic.twitter.com/9XopOFs6ir
— Star Sports (@StarSportsIndia) March 25, 2024
प्लेऑफ सामन्याचं काय?
प्लेऑफ सामन्याचं आयोजन हे अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये करण्यात आलं आहे. फायनल आणि क्वालिफायर 2 मॅचचं आयोजन चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरचा थरार अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. पंरपरेनुसार, आयपीएल गतविजेत्या संघाच्या शहरात फायनल सामन्याचं आयोजन करण्यात येतं.
प्लेऑफचं वेळापत्रक
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांना 21 मे पासून सुरुवात होईल. पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर 22 मे रोजी एलिमिनेटर सामना होईल. हा सामनाही अहमदाबादमध्येच होईल. तर 24 मे ला दुसरा क्वालिफायर होईल. तसेच 26 मे रोजी अंतिम सामना होईल.