GT vs CSK Toss : चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, गुजरातच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण?
Gujarat Titans vs Chennai Super Kings Toss : चेन्नई सुपर किंग्सने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टॉस जिंकत गुजरातला बॅटिंगसाठी बोलावलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचं नेतृत्व आहे. तर ऋतुराज गायकवाड चेन्नईचं कर्णधारपद सांभाळत आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
ऋतुराजची या हंगामात टॉस जिंकण्याची ही 12 सामन्यातली दुसरीच वेळ ठरली आहे. सीएसकेने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. रिचर्ड ग्लीसन याच्या जागी रचीन रवींद्र याचा समावेश प्लेईंग ईलेव्हनमध्ये करण्यात आला आहे. तर यजमान गुजरात टायटन्सने 2 बदल केले आहेत. विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा याच्या जागी मॅथ्यू वेड याचा समावेश केला गेला आहे. तर वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी याला संधी देण्यात आली आहे. कार्तिकचं हे गुजरातासाठीचं पदार्पण ठरलं आहे. कार्तिकने याआधी सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे.
चेन्नई-गुजरात दुसऱ्यांदा आमनेसामने
चेन्नई विरुद्ध गुजरात या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. याआधी उभयसंघात 26 मार्च रोजी सामना झाला होता. तेव्हा चेन्नईने गुजरातवर 63 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता गुजरातकडे आपल्या घरच्या मैदानात चेन्नईवर मात करुन गेल्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
दरम्यान चेन्नई आणि गुजरात दोन्ही संघांचा हा 12 वा सामना आहे. चेन्नईने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. चेन्नईला सहजासहजी प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल, तर हा सामना जिंकावा लागेल. तर गुजरातसाठी हा सामना करो या मरो असा आहे. गुजरातने 11 पैकी 4 सामनेच जिंकले आहेत. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानी आहे. गुजरातला आव्हान कायम राखायचं असेल, तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
चेन्नईने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@ChennaiIPL win the toss and elect to bowl against @gujarat_titans
Follow the Match ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/UewTAubgeb
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा आणि कार्तिक त्यागी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग.