GT vs CSK : शुबमन गिल-साई सुदर्शन ओपनिंग जोडीचा शतकी तडाखा, चेन्नईसमोर 232 रन्सचं टार्गेट
IPL 2024 GT vs CSK 1st Innings Recap In Marathi : साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनी केलेल्या 210 धावांच्या सलामी भागीदारीच्या जोरावर गुजरातने चेन्नईसमोर 232 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
कॅप्टन शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 232 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक धावा केल्या. शुबमन गिल याने 104 धावा केल्या. तर साई सुदर्शन याने 103 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने नाबाद 16 धावा जोडल्या. शाहरुख खान 2 धावांवर रन आऊट झाला. तुषार देशपांडे याने दोन्ही विकेट्स घेतल्या.
210 धावांची विक्रमी भागीदारी
शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने या हंगामात विक्रमी सलामी भागीदारी केली. तसेच लखनऊ सुपर जायंट्सच्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल या सलामी जोडीच्या 210 धावांच्या भागीदारीच्या विक्रमाची बरोबरी केली. क्विंटन आणि केएल या दोघांनी 2022 साली ही कामगिरी केली होती. साई आणि शुबमन या दोघांनी 210 धावांच्या भागीदारी दरम्यान वैयक्तित शतक झळकावलं. दोघांमध्ये कोण आधी शतक ठोकणार अशी स्पर्धाच लागली होती. मात्र यात शुबमन गिल यशस्वी ठरला. त्यानंतर साईने शतक ठोकलं. मात्र दोघेही शतक ठोकल्यांतर झटपट आऊट झाले.
साईने 51 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 5 फोरसह 201.96 च्या स्ट्राईक रेटने 103 धावा केल्या. तर शुबमन गिलने 55 बॉलमध्ये 6 षटकार आणि 9 चौकारांसह 189.09 च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या. तर डेव्हिड मिलर याने 11 बॉलमध्ये 145.45 च्या स्ट्राईक रेटने 1 चौकारासह 16 धावांची नाबाद खेळी केली. आता चेन्नई या विजयी आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
शुबमन गिल-साई सुदर्शन यांचा धमाका
Highest Opening Partnership for #GT ✅ Equalled Highest Opening Partnership in IPL ✅
Courtesy of the centurions, the hosts set a massive 🎯 of 2️⃣3️⃣2️⃣ 👏
A huge #CSK chase coming up next ⏳
Scorecard ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/eeLGLcOzyQ
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा आणि कार्तिक त्यागी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग.