GT vs CSK : शुबमनचं ऐतिहासिक शतकानंतर आक्रमक सेलिब्रेशन, चेहऱ्यावर वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्याचा राग!
Shubman Gill Angry Celebration After Century : शुबमन गिल याने आयपीएल कीरकीर्दीतील चौथं शतक हे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ठोकलं. शुबमनने या शतकानंतर केलेला जल्लोष चर्चेचं कारण ठरलं आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विस्फोटक शतक ठोकलं. शुबमन गिलचं हे शतक अनेक अर्थाने विक्रमी ठरलं. शुबमनने ठोकलेलं हे आयपीएलच्या इतिहासातील एकूण 100 वं शतक ठरलं. अर्थात आयपीएलमधील शतकांचं शतक हे शुबमन गिलच्या बॅटने आलं. शुबमनच्या आयपीएल कारकीर्दीतील हे चौथं, नरेंद्र मोदी स्टेडियममधील तिसरं आणि कॅप्टन म्हणून हे पहिलं शतक ठरलं. शुबमनने शतक ठोकल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन केलं. शुबमनच्या या आक्रमक जल्लोषाचा रोख हा बीसीसीआय निवड समितीकडे होता, असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
शुबमन गिलने 196.15 च्या स्ट्राईक रेटनने 52 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. शुबमनच्या या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. शुबमनच्या या शतकानंतर गुजरातच्या डगआऊटमधील सर्व खेळाडूंनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्याा. तसेच जॉन्टी ऱ्होड्स यांनीही त्याचं अभिनंदन केलं. शुबमनने यावेळेस हवेत उडी मारत हाताने हेल्मेट हवेत वर करत आक्रमक सेलिब्रेशन केलं. शुबमनच्या चेहऱ्यावर यावेळेस एका प्रकाराचा राग दिसून येत होता.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी 30 एप्रिल रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वर्ल्ड कप मुख्य संघातून शुबमन गिल याला वगळण्यात आलं. शुबमन गिल याचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला. शुबमनने हाच राग आपल्या या जल्लोषातून व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच शुबमनच्या या जल्लोषाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.
शुबमन गिलचं आक्रमक जल्लोष
Shubman Gill brings up #TATAIPL‘s 100th 💯
The captain leading from the front for @gujarat_titans 🫡
Follow the Match ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/sX2pQooLx0
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा आणि कार्तिक त्यागी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग.