IPL 2024 GT vs KKR Live Streaming : गुजरातसाठी अखेरची संधी, घरच्या मैदानात कोलकाताचं आव्हान
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Live Streaming : कोलकाताने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. मात्र गुजरातसाठी हा सामना करो या मरो असा आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 63 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यर याच्याकडे केकेआरची सूत्रं आहेत. तर युवा शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करतोय. केकेआरने प्लेऑफमध्ये आधीच धडक मारली आहे. त्यामुळे केकेआरचा गुजरात विरुद्ध जिंकून टॉप 2 मधील स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर गुजरातसाठी हा करो या मरो असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
कोलकाता आणि गुजरात दोन्ही संघांचा हा 13 वा सामना असणार आहे. केकेआरने 12 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. केकेआर 18 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. तर गुजरातला 12 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर 7 वेळा पराभवाचा सामना करायला लागला आहे. गुजरातचे आकडे पाहता त्यांना प्लेऑफची शक्यता फार कमी आहे. मात्र निश्चित काही सांगता येत नाही. त्यामुळे गुजरात शेवटच्या सामन्यापर्यंत जोरदार लढत देणार आहे.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना केव्हा?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना आज 13 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना कुठे?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), केन विल्यमसन, ऋद्धिमान साहा मॅथ्यू वेड (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, जोशुआ लिटल, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुथार, विजय शंकर आणि सुशांत मिश्रा.
कोलकाता नाइट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन आणि अल्लाह गझनफर.