GT vs RCB : साईची तडाखेदार बॅटिंग, शाहरुख दमदार अर्धशतक, आरसीबीसमोर 201 रन्सचं टार्गेट
Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru 1st Innings Highlights In Marathi : गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर विजयासाठी 201 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
साई सुदर्शन याची झंझावाती बॅटिंग आणि शाहरुख खान याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या गुजरातची निराशाजनक सुरुवात झाली. आरसीबीने गुजरातला 7 ओव्हरच्या आत 2 झटके देत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर शाहरुख खान आणि साई सुदर्शन या जोडीने अफलातून बॅटिंग करत गुजरातला 200 धावांपर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. तर डेव्हिड मिलर यानेही यात योगदान दिलं.
गुजरातची बॅटिंग
ऋद्धीमान साहा (5) आणि शुबमन गिल 16 धावांवर बाद झाल्याने गुजरातची स्थिती 6.4 ओव्हरमध्ये 2 बाद 45 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि शाहरुख खान या दोघांनी आपल्या खांद्यावर गुजरातची जबाबदारी घेतली. या दोघांनी तडाखेदार बॅटिंग केली. या दरम्यान शाहरुख खान याने अर्धशतक झळकावलं. मात्र अर्धशतकाच्या 8 धावांनंतर शाहरुख खान आऊट झाला. शाहरुख आणि साईने तिसऱ्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 86 धावांची भागीदारी केली. शाहरुखचं या भागीदारीत 31 बॉलमध्ये 58 धावांचं योगदान राहिलं. शाहरुखने 30 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 58 धावांची खेळी केली.
शाहरुख आऊट झाल्यानंतर डेव्हिड मिलर मैदानात आला. साईने डेव्हिडच्या सोबतीने चौथ्या विकेटसाठी 39 बॉलमध्ये 69 रन्सची पार्टनरशीप केली. मिलरकडून फिनीशिंग टचची अपेक्षा होती. मात्र मिलरला मोठे फटके मारण्यात यश येत नसल्याने दुसऱ्या बाजूने साईने फटकेबाजी सुरु ठेवली. त्यामुळे गुजरातला 200 पार मजल मारता आली. साईने 49 बॉलमध्ये 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 84 धावांची नाबाद खेळी केली. तर डेव्हिड मिलरने 19 बॉलमध्ये नाबाद 26 धावा केल्या. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल, स्वप्नील सिंह आणि मोहम्मद सिराज या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
गुजरातचं द्विशतक
Innings Break!#GT set a 🎯 of 2️⃣0️⃣1️⃣ with counter attacking fifties from the middle order! 👌
Chase starts 🔜 with #RCB on the hunt for consecutive wins! 🙌
Scorecard ▶️ https://t.co/SBLf0DonM7#TATAIPL | #GTvRCB pic.twitter.com/3ZvPpkYdPX
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद आणि मोहित शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.