GT vs KKR Rain : पावसाची गुजरात विरुद्ध ‘बॅटिंग’, सामना रद्द, स्पर्धेतून पॅकअप
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders IPL 2024 Rain : पावसामुळे गुजरा टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द झाला आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 63 वा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र सातत्यपूर्ण पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. बराच वेळ पाऊस थांबवण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर सामान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. हा सामना रद्द झाल्याने गुजरात टायटन्सचं आयपीएलच्या 17 व्या मोसमातून पॅकअप झालं आहे.
गुजरात टायटन्ससाठी हा करो या मरो असा सामना होता. गुजरातला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोलकाता विरुद्ध विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र सामन्याआधीच पावसाने नरेंद्र मोदी स्टेडियम आणि आसपासच्या भागात जोरदार बॅटिंग केली. पावसाची ही बॅटिंग गुजरातच्या विरोधात ठरली. बराच वेळ प्रतिक्षा पाहिल्यानंतर नाईलजाने अखेर सामना रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे मोठ्या आशेने सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांची आणि दोन्ही संघांची निराशा झाली आहे.
सामना रद्द झाल्याने गुजरात आणि कोलकाता दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आलाय. सामना रद्द झाल्याने गुजरातचं प्लेऑफमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग झालंय. गुजरातला उर्विरित आणि अखेरचा सामना जिंकल्यानंतरही प्लेऑफमध्ये पोहचता येणार नाही. तर दुसऱ्या बाजूला केकेआरला 1 गुण मिळाल्याने त्यांचे एकूण 19 पॉइंट्स झाले आहेत. त्यामुळे केकेआर साखळी फेरीत किमान दुसऱ्या स्थानी राहिल. त्यामुळे केकेआरला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.
गुजरात-कोलकाता सामन्यात पावसाचा विजय
🚨 Update from Ahmedabad 🚨
Match 6️⃣3️⃣ of #TATAIPL 2024 between @gujarat_titans & @KKRiders has been abandoned due to rain 🌧️
Both teams share a point each 🤝#GTvKKR pic.twitter.com/Jh2wuNZR5M
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2024
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), केन विल्यमसन, ऋद्धिमान साहा मॅथ्यू वेड (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, जोशुआ लिटल, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुथार, विजय शंकर आणि सुशांत मिश्रा.
कोलकाता नाइट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन आणि अल्लाह गझनफर.