IPL 2024 | पैसे नाहीत म्हणून मॅगी खाणाऱ्या पंड्याचा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होईपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या

आयपीएलच्या 17 व्या सीझनला सुरूवात होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने 30 वर्षीय पंड्याकडे थेट कर्णधारपद दिलंय. मात्र नऊ वर्षांआधी 2015 साली हार्दिकला मुंबईने बेस प्राईज 10 लाख रूपयांमध्ये विकत घेतलं होतं. आता हाच पंड्या कॅप्टन म्हणून संघाची धुरा सांभाळणार आहे. गेल्या नऊ वर्षातील हार्दिकची कामगिरी नेमकी कशी राहिली जाणून घ्या.

IPL 2024 | पैसे नाहीत म्हणून मॅगी खाणाऱ्या पंड्याचा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होईपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 6:33 PM

मुंबई : टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणून पाहिलं जात असलेला हार्दिक पंड्या आताही या रेसमध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीनंतर तो आयपीएल लिलावामध्ये सहभागी झाला. बडोदा संघाकडून खेळणाऱ्या हार्दिकने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत एका ओव्हरमध्ये तब्बल 39 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे लिलावामध्ये त्याला फ्रँचायसी उचलणार यात काही शंका नव्हती. लिलावामध्ये हार्दिकला मुंबईने बेस प्राईज 10 लाखांमध्ये  खरेदी केलं. त्याने 19 एप्रिल 2015 ला मुंबईकडून आरसीबीविरूद्ध पदार्पण केलं. फिल्डिंगमध्येही चपळ, मीडियम फास्ट बॉलर असल्याने मॅचमध्ये त्याची उपस्थिती दिसायचीच. हार्दिकने 2015 मध्ये केकेआरविरूद्ध 31 बॉलमध्ये 61 धावांची वादळी खेळी केली. या जबरदस्त बॅटींगमुळे सर्वांसाठी तो आकर्षण ठरला आणि सर्वाचं लक्ष त्याने वेधून घेतलं.

पंड्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

2015 साली हार्दिकने आपल्या डेब्यू सीझनमध्ये अवघ्या नऊ सामन्यांमध्ये 180.64 च्या स्ट्राईक रेटने 112 धावा केल्या होत्या. केकेआरविरूद्धची 61 धावांची शानदार खेळी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली होती. हार्दिकसाठी हे वर्ष टर्निंग पॉईंट ठरलं, कारण आयपीएलमधील बेस्ट खेळाडू ठरला होता. त्यानंतर 2016 मध्ये त्याने आशिया कपमध्येही आपला ठसा उमटवला होता, आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये 26 जानेवारी 2016 साली त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पण केलं होतं. टी-20 नंतर पंड्याची वन डे संघातही निवड झाली. 16 ऑक्टोबर 2016 मध्येच त्याने हिमाचल प्रदेशमधील मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध पदार्पण केलं होतं.

हार्दिक पंड्याने केलेल्या दमदार कामगिरीमुळे मुंबई संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये त्याने आपली जागा फिक्स केली. आयपीएलमध्ये हार्दिक मुंबईसाठी तो चांगली कामगिरी करत होताच तर टीम इंडियाकडूनही त्याने खेळताना आपली छाप पाडली होती. मुंबईचा हार्दिक हा स्ट्राईक प्लेयर झाला. 2016 मधील वर्ल्ड कपमध्ये हार्दिकने बांगलादेशविरूद्ध टाकलेली शेवटची ओव्हर अजुनही सर्वांना आठवते. 3 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती. या तिन्ही बॉलवर टीमला विकेट मिळालेली, धोनीने शेवटच्या बॉलवर केलेला रन आऊट सर्वांचा लक्षात आहे. हार्दिकने त्यावेळी नवखा असताना हिमतीने सामना केलेला. मुंबईनेही त्याला 2016 आणि 2017 साठी रिटेन केलं. मात्र या दोन वर्षात त्याने कमालीची उंची गाठली होती.

पंड्यासाठी सुवर्णकाळ

हार्दिक पंड्याला मुंबईने 2018 ला ११ कोटीं देत संघात कायम ठेवलं. त्यानंतर हार्दिक 2019, 2020आणि 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाकडून 11 कोटी रूपयांमध्ये खेळत होता. त्यानंतर त्याला रीलीज करण्यात आलं. आयपीएलमध्ये उतरलेला नवा संघ गुजरात टायटन्स संघाने त्याला कॅप्टन करत 15 कोटी रूपयांना खरेदी केलं. पंड्यानेही आपल्या नेतृत्त्वात संघाला यश मिळवून देत पहिल्याच वर्षी 2022 साली विजेतेपद जिंकलं. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2023 साली हार्दिकने गुजरात संघाला फायनलमध्ये नेलं होतं. मात्र सीएसकेकडून त्यांना शेवटच्या ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.

हार्दिक पंड्याची कामगिरी

हार्दिक पंड्या याने 86 वन डे सामने खेळले असून 1769 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 अर्धशतके केली आहेत. 92 त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 11 कसोटी सामन्यांमध्ये 532 धावा केल्या असून यामध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 मध्ये 92 सामन्यांमध्ये 1348 धावा केल्या असून यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर आयपीएलमध्ये त्याने 123 सामने खेळले असून 2309 धावा केल्या आहेत. यामध्ये दहा अर्धशतकांचा समावेश असून 91 त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

बॉलिंगमधील कामगिरी पाहिली तर 11 कसोटीमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत. यामधील 5-28 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर वन डेमध्ये 84 विकेट घेतल्या असून 4-24 त्याची सर्वोत्तम कामगिरी, टी-20 मध्ये 73 विकेट्स तर आयपीएलमध्ये 53 विकेट त्याने घेतल्या असून 3-17 ही बेस्ट कामगिरी राहिली आहे.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलआधी हार्दिक पंड्या याला मुंबई संघाने ट्रेडिंग विन्डोमधून खरेदी केलं. हार्दिक हा ट्रेडिंग विन्डोमध्ये खरेदी झालेला दुसरा कर्णधार ठरलाय. मुंबईने त्याला आता आपला सेनापती केलं असून रोहितकडून कॅप्टन्सी काढून घेतली गेली आहे. आपल्या नेतृत्त्वात पंड्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल फायनल संंघ 2024 रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.

'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.