IPL 2024 | सूर्यकुमारशिवाय पलटण खेळण्यासाठी सज्ज! असा आहे सुधारित संघ
Ipl 2024 Mumbai Indians Squad | आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ अशी बिरुदावली मिरवणारी मुंबई इंडियन्स टीम यंदा 17 व्या हंगामात अनेक बदलांग खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाची लगबग सुरु झाली आहे. यंदाच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात होणार आहे. तसेच अनेक संघ या हंगामात अनेक बदलांसह खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी टीम मुंबई इंडियन्स नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माऐवजी आता हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणार आहे. मुंबई इंडियन्सचा या मोसमातील पहिला सामना केव्हा असणार आणि टीममध्ये कोण कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
भारतात एप्रिल ते जून दरम्यान सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 17 दिवसांमध्ये एकूण 21 सामने होणार आहेत. मुंबई पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना हा 24 मार्च रोजी खेळणार आहे. मुंबईचा पहिल सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.
मुंबई इंडियन्सचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 24 मार्च, संध्याकाळी साडे सात वाजता. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 27 मार्च, संध्याकाळी साडे सात वाजता. मुंबई इंडियन्स विरुद्ध रााजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, संध्याकाळी साडे सात वाजता. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स, 7 एप्रिल, दुपारी साडे तीन वाजता.
क्वेना मफाका याचा समावेश
मुंबई इंडियन्समध्ये क्वेना मफाका याचा समावेश करण्यात आला आहे. दिलशान मधुशंका हा 17 व्या हंगामाआधी दुखापतीमुळे बाहेर पडल्याने 17 वर्षीय दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.
सूर्याची 21 मार्चला अग्निपरीक्षा
सूर्यकुमार यादव 19 मार्च रोजी बंगळुरुतील एनसीएमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी झाला. आता 21 मार्चला पुन्हा फिटनेस टेस्ट होणार आहे. सूर्यकुमारसाठी ही टेस्ट फार महत्त्वाची असणार आहे. सूर्यकुमार यादव या 17 व्या हंगामातील पहिल्या 2 सामन्यातून बाहेर पडला असल्याचीही चर्चा आहे.
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, गेराल्ड कोएत्झी, क्वेना मफाका , नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, रोमारियो शेफर्ड आणि नमन धीर.