IPL मध्ये सनरायजर्स हैदराबादच्या या खेळाडूच्या नावावर सर्वात वाईट विक्रमाची नोंद
आयपीएल 2024 मध्ये मोठे विक्रम रचले गेले आहेत. सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही यंदा मोडला गेला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाने कामगिरी करून दाखवली पण एका वाईट विक्रमाची नोंद हैदराबाद संघाच्या खेळाडूच्या नावावर झाली आहे.
आयपीएलमधील आजच्या डबर हेडर सामन्यामध्ये दुपारी सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. हा सामना गुजरात संघाने सात विकेटने जिंकला. आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम रचणाऱ्या हैदराबाद संघाला 20 ओव्हरमध्ये 162-8 धावा करता आल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी हैदराबाद संघातील खेळाडूंवर अंकुश ठेवल्याचं पाहायला मिळालं. हैदराबादने हा सामना गमावलाच त्यासोबतच त्यांच्या संघातील एका खेळाडूवर वाईट विक्रमाची नोंद झाली. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
सनरायजर्स हैदराबाद संघाची बॅटींग खराब झालेली पाहायला मिळाली. सुरूवात चांगली करत होते मात्र त्यानंतर विकेट जात होत्या. गुजरात संघाकडून मोहित शर्मा याने तीन विकेट घेतल्या. यामधील एक विकेट म्हणजे हैदराबाद संघाचा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलं होतं. मात्र सुंदर पहिल्याच बॉलवर आऊट झाला. आऊट झालेल्या सुंदरच्या नावावर एका वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.
आयपीएलमध्ये इम्पॅ्क्ट प्लेअरचा नियम जेव्हापासून लागू करण्यात आलाय तेव्हापासून इम्पॅक्ट खेळाडू शून्यावर आणि गोल्डन डक होण्याची दुसरी वेळ ठरली आहे. मोहित शर्मा याच्या स्लो शॉर्ट बॉलवर सुंदरने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र रशीद खान याच्या हातात झेल देऊ बाद झाला. याआधी हा विक्रम दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू अनुकुल रॉय याच्या नावावर होता. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोल्डन डक होणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.