IPL 2024 : जसप्रीत बुमराहच्या ‘त्या’ पोस्टमुळे रंगली जोरदार चर्चा, मुंबई इंडियन्सच्या गोटात खळबळ
आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी क्रिडाविश्वात खळबळ उडाली आहे. खेळाडूंचं अदानप्रदान पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. असं असताना जसप्रीत बुमराह याच्या पोस्टमुळे संशयाची पाल चुकचुकत आहे.
मुंबई : आयपीएल स्पर्धत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांचा दबदबा राहिला आहे. या दोन संघांनी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदाचा मान मिळवला आहे. आतापर्यंत झालेल्या 16 पर्वात दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे या दोन संघात काही बदल झाल्यास चर्चा होणार यात शंका नाही. सध्या हार्दिक पांड्याचं पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याने चर्चा रंगली आहे. मुंबईने 2022 रिलीज केल्यानंतर गुजरात टायटन्सने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेत नेतृत्व सोपवलं होतं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल 2022चं जेतेपद जिंकलं होतं. तर मागच्या पर्वात म्हणजेच 2023 पर्वात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहच्या पोस्टमुळे आलबेल नसल्याचं दिसून आलं आहे.
जसप्रीत बुमराह 2013 पासून आयपीएल खेळत असून मुंबई इंडियन्ससोबत आहे. त्यानंतर प्रत्येक पर्वात जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन दिसून आलं. पण पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह 2023 आयपीएल स्पर्धेला मुकला. तरीही मुंबई इंडियन्सने त्याला रिटेन केलं आहे. पण जसप्रीत बुमराहच्या इंस्टा स्टोरीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. बुमराह मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर नाराज असल्याचं दिसत आहे. इतकं काय तर फ्रेंचाईसी सोडणार असल्याचा चर्चांना उधाण आलं आहे.
Jasprit Bumrah's Instagram story. pic.twitter.com/EgpAirzwai
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 28, 2023
Jasprit Bumrah unfollowed Mumbai Indians after the cryptic story pic.twitter.com/Rdwgt9qbXz
— Div🦁 (@div_yumm) November 28, 2023
Jasprit Bumrah never followed Mumbai Indians on Instagram, he never followed BCCI either.
This is another classic case of social media jumping to conclusions without any knowledge or information.
Mumbai Indians was, is and will always be ONE FAMILY @mipaltan 💙 pic.twitter.com/G9shuQbcBv
— Utsav 💔 (@utsav__45) November 28, 2023
Jasprit Bumrah joining CSK after an apparent rift with MI
Deepak Chahar and Jasprit Bumrah opening the bowling together for uspic.twitter.com/Go10L0ywPt
— Bakri Player (@91_of_79) November 28, 2023
हार्दिकच्या पुनरागमनामुळे बुमराहच्या सुप्त इच्छांना सुरूंग लागला आहे. रोहित शर्मा याच्यानंतर कर्णधारपदाची माळ बुमराहच्या गळ्यात पडेल अशी चर्चा होती. पण हार्दिक आल्याने आता कर्णधारपद मिळणं कठीण आहे. बुमराहने इंस्टा आणि ट्विटरवरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आहे. तसेच एमएस धोनीला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. बुमराहने इंस्टोस्टोरी लिहिलं आहे की, कधी कधी गप्प बसणं चांगलं उत्तर असतं. त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोबत असेल की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण जसप्रीत बुमराहच्या पोस्टमुळे नक्कीच काहीतरी घडतंय, हे अधोरेखित होत आहे. हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांना मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. रोहित शर्माकडेच मुंबई इंडियन्स नेतृत्व राहिल की हार्दिक पांड्याला मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे.