IPL 2024 | आयपीएल 2024 आधी झटक्यात 3 कर्णधार बदलले

IPL 2024 Captain | आयपीएल 17 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. त्याआधी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. मात्र त्याआधी एकूण 3 संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत, कोण आहेत ते नवने कर्णधार?

IPL 2024 | आयपीएल 2024 आधी झटक्यात 3 कर्णधार बदलले
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 8:57 PM

मुंबई | दुबईत मंगळवारी आयपीएल 2024 ऑक्शन पार पडलं. या ऑक्शमधून एकूण 10 संघांनी 72 खेळाडूंची खरेदीी केली. या 10 संघांनी 70 खेळाडूंसाठी 230 कोटी 45 लाख रुपये रक्कम खर्च केली. सर्वाधिक रक्कम ही मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मिळाली. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्क याला 24 कोटी 75 लाख रुपयात खरेदी केलं. तर पट कमिन्स याला सनरायजर्स हैदराबादने 20 कोटी 50 लाख रुपयात आपल्या टीममध्ये घेतलं. या ऑक्शनआधी काही संघांचे कर्णधार बदलण्यात आले. कोणत्या टीमचे कॅप्टन बदलले गेले हे आपण जाणून घेऊयात.

कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या 3 संघानी कर्णधार बदलले. आयपीएल ऑक्शनआधी कोलकाता नाईट रायडर्सने टीमची सूत्र श्रेयस अय्यर याच्याकडे सोपवली. श्रेयस अय्यर गेल्या 16 व्या मोसमात पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे नितीश राणा याने कॅप्टन्सी केली. मात्र आता श्रेयस खेळणार आहे. त्यामुळे नितीश राणाला उपकर्णधार करत श्रेयसला पुन्हा एकदा कॅप्टन्सी देण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोद्वारे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याला आपल्या गोटात घेतलं. हार्दिकची यासह घरवापसी झाली. मुंबई टीममध्ये आल्यानंतर हार्दिकला रोहित शर्मा याच्याकडे असलेलं कर्णधारपद देण्यात आलं. रोहितचं कर्णधारपद काढून घेतल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते खवळले. त्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवरुन अनफॉलो केलं.

आता हार्दिक गुजरात टायटन्सचं नेतृत्व सांभाळत होता. मात्र तो आता आला मुंबई इंडियन्समध्ये. त्यामुळे तिथे कॅप्टन म्हणून जागा रिक्त होती. गुजरात टायटन्स टीम मॅनजमेंटने कर्णधारपदाची माळ ही युवा ओपनर फलंदाज शुबमन गिल याच्या गळ्यात टाकली. अशाप्रकारे आयपीएल 17 वं मोसम सुरु होण्याआधी एकूण 3 संघांचे कर्णधार बदलले आहेत.

मुंबई, गुजरात आणि कोलकाता टीम

मुंबई इंडियन्स | हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, दिलशान मधुशंका, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, श्रेयस गोपाळ आणि नुवान तुषारा.

गुजरात टायटन्स | शुबमन गिल (कॅप्टन), डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नलकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, , उमेश यादव, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, अजमतुल्लाह उमरजई, स्पेंसर जॉनसन, शाहरुख खान, रॉबिन मिन्ज, नूर अहमद, आर साई किशोर आणि राशिद खान.

कोलकाता नाईट रायडर्स | श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, मिचेल स्टार्क, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गेस एटकिंसन, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसैन आणि चेतन सकारिया.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.