IPL 2024, KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातील या खेळाडूंवर असेल मदार, जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील 47वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल. हे खेळाडू सामना फिरवण्याची ताकद ठेवतात, जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत

IPL 2024, KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातील या खेळाडूंवर असेल मदार, जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 4:16 PM

आयपीएल 2024 स्पर्धा हळूहळू शेवटच्या टप्प्यात येत आहे. या स्पर्धेतल्या साखळी फेरीतला 47वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 8 सामने खेळली असून त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभव सहन केला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने दहा सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होत आहे. मागच्या दोन सामन्यात या मैदानावर 220 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. इथली खेळपट्टी फलंदाजांना पूरक आहे. त्यामुळे गोलंदाजांची काही खैर नाही. हे दोन्ही संघ 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 17 वेळा कोलकात्याने, 15वेळा दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. ईडन गार्डनवर कोलकात्याने 6 वेळा दिल्लीला लोळवलं आहे. तर दोन वेळा कोलकात्याला मात देण्यात दिल्लीला यश आलं आहे. कोलकात्याने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी धुव्वा उडवला होता.

या सामन्यात काही खेळाडूंमधलं द्वंद्व पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. आंद्रे रस्सेल आणि कुलदीप यादव यांच्यात एक वेगळाच सामना पाहायला मिळेल. आंद्रे रस्सेल 189.46 च्या स्ट्राईक रेट फलंदाजी करत आहे. तर कुलदीप यादव जबरदस्त फॉर्मात आहे. तसंच काहीसं सुनील नरीन आणि खलील अहमद यांच्यातील द्वंद्वही पाहता येईल. ऋषभ पंत-वरुण चक्रवर्थी आणि जेक फ्रेझर मॅकगुर्क-सुनील नरीन असाही सामना पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरीन, फिल सॉल्ट, आंद्रे रसेल, हर्षित राणा, श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंह हे खेळाडू चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. तर दिल्ली कॅपिटल्सकडून शाई होप, ऋषभ पंत, जेक फ्रेझर मॅकगुर्क, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात. कोलकात्याच्या सहा, तर दिल्लीच्या पाच खेळाडूंकडे या सामन्याची चावी असणार आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.