IPL 2024 KKR vs DC Live Streaming : दिल्ली-कोलकाता दुसऱ्यांदा आमनेसामने, कॅप्टन पंत पराभवाचा वचपा घेणार?
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Streaming : दिल्ली आणि कोलकाता या दोन्ही संघात या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांचा आमनासामना होणार आहे. श्रेयस अय्यर केकेआरचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत हा दिल्लीचं कर्णधारपद सांभाळणार आहे. दिल्ली आणि केकेआरचा या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. त्याआधी दोन्ही संघात 3 एप्रिलला सामना झाला होता. तेव्हा केकेआरने दिल्लीवर 106 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्लीकडे केकेआरवर या सामन्यात विजय मिळवून पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.
दिल्लीचा हा 11 वा तर कोलकाताचा नववा सामना असणार आहे. सामन्यांचा अपवाद सोडला तर दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. केकेआरने 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवलाय. केकेआर 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीने 10 पैकी 5 सामन्यात विजय मिळवलाय. दिल्ली 10 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे दिल्ली केकेआरवर मात करत मागील पराभवाचा वचपा घेणार, की केकेआर प्लेऑफच्या दिशेने आणखी पुढे जाणार, याकडे लक्ष असणार आहे.
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना केव्हा?
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना सोमवारी 29 एप्रिल रोजी होणार आहे.
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना कुठे?
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना इडन गार्डन येथे होणार आहे.
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे फुकटात पाहायला मिळेल.
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कॅप्टन), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजे राणा रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झाय रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.