IPL 2024, KKR vs LSG : कोलकात्याचा लखनौ सुपर जायंट्सला दणका, 8 विकेट्स राखून केलं पराभूत
आयपीएल स्पर्धेतील 28 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगला. या सामन्यात कोलकात्याने लखनौवर मात केली. विजयासाठी दिलेल्या 162 धावा 2 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कौलकाता नाईट रायडर्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकात 7 गडी गमवून 161 धावा करता आल्या. विजयासाठी 162 धावांचं आव्हान लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर ठेवलं. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी राखून षटकात पूर्ण केलं. कोलकात्याचा स्पर्धेतील हा चौथा विजय आहेय या विजयासह 8 गुणांसह गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्सने दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. कोलकात्याकडून फिलिप सॉल्टने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे विजय सहज सोपा झाला. पराभवामुळे लखनौ सुपर जायंट्सचं नुकसान झालं आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
लखनौ सुपर जायंट्सकडून कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पूरन सोडून एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. आयुष बदानीने 29 धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाज मैदानात आले आणि परत गेले अशीच स्थिती होती. एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. क्विंटन डिकॉक 10, केएल राहुल 39, दीपक हूडा 8, आयुष बदानी 29, मार्कस स्टोइनिस 10, निकोलस पूरन 45, अर्शद खान 5 आणि कृणाल पांड्या नाबाद 7 धावांवर राहिला. कोलकात्याकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर वैभव अरोरा, सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
कोलकात्याची सुरुवातही हवी तशी झाली नाही. त्यामुळे सुरुवातीला दडपण आलं होतं. मात्र फिलिप साल्ट आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला आणि संघाला विजय मिळवून दिला. सुनील नरीन 6, तर अंगकृष रघुवंशी 7 धावा करून बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि फिलिप सॉल्ट यांनी मोर्चा सांभाळला आणि गाडी विजयी ट्रॅकवर आणली. दोघांनी 120 धावांची भागीदारी केली. फिलिप्स सॉल्टने 47 चेंडूत नाबाद 89 धावांची खेळी केली. यात 14 चौकार आणि 3 षटकार मारले. तर श्रेयस अय्यरने 38 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णदार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.